दिंडोरी-मोहाडी ते महामार्ग चौपदरीकरणाला येणार गती
By admin | Published: December 13, 2014 01:59 AM2014-12-13T01:59:45+5:302014-12-13T02:00:51+5:30
दिंडोरी-मोहाडी ते महामार्ग चौपदरीकरणाला येणार गती
नाशिक : जिल्'ातील दिंडोरी-मोहाडी ते राज्य महामार्ग-३ यादरम्यान रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या खर्चाच्या सुधारित अंदाजपत्रकात शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली असून, त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामाला गती येणार आहे. जिल्'ातील दिंडोरी-मोहाडी ते राज्य महामार्ग-३ या रस्त्याच्या चौपदरीकरणास नोव्हेंबर २०१३ मध्येच शासनाने मान्यता देऊन त्यासाठी २५ कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चाच्या कामास प्रशासकीय मंजुरी दिली होती. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी जून २०१४ मध्ये ३५ कोटी ४ लाख २६ हजार इतक्या रकमेच्या खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात रस्त्याचे चौपदरीकरण करणे, स्लॅब ड्रेन, पूल व मोऱ्यांचे बांधकाम, जंक्शनच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणे व रस्ता दुभाजक उपलब्ध करून देणे, सेवावाहिनी व विद्युत लाइन स्थलांतरण करणे आदि कामांचा समावेश आहे. शासनाने या सुधारित अंदाजपत्रकात मान्यता दिली असून, प्रथम भूसंपादनाची कार्यवाही करण्याचे आदेश काढले आहेत. शासनाने आता सुधारित अंदाजपत्रकास मान्यता दिल्याने दिंडोरी-मोहाडी ते राज्य महामार्ग क्रमांक ३ या रस्त्याच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाला गती येणार आहे.