ग्रामपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:01 PM2019-06-01T18:01:04+5:302019-06-01T18:01:15+5:30
इगतपुरी तालुका : गोंदे दुमाला येथील लढतीकडे लक्ष
इगतपुरी : तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीच्या सुरु असलेल्या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी ३६ पैकी ७ गावातील सरपंच पदासाठी ७ तर सदस्य पदासाठी २० अर्ज दाखल झाले आहेत. यावेळी इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह गर्दी केली होती. तहसील कार्यालयात गोंदे दुमाला येथील उमेदवारांनी आपल्या शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. मोठया प्रमाणात औद्योगिक व विकसित गाव म्हणुन गोंदे दुमालाची ओळख आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. अनुसुचित जातीला प्रथमच आरक्षणाची संधी मिळाल्यामुळे या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी चुरस पहावयास मिळणार आहे. निवडणुकीसाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या ठिकाणी १० सदस्यासाठी निवडणूक होणार असुन सरपंच पदासाठी अश्विनी सोनवणे, शरद सोनवणे यांनी तर सदस्य पदासाठी गणपत जाधव, कृष्णा सोनवणे, सिताबाई नाठे, रामभाऊ नाठे, नंदु नाठे, शोभा नाठे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच बेलगाव तºहाळे सरपंच पदासाठी १ तर सदस्य पदासाठी २ अर्ज, घोटी बुद्रुक ४ सदस्य, कुºहेगाव १ सदस्य, वाडीवºहे २ सरपंचपदासाठी तर ३ सदस्यपदासाठी, गोंदे दुमाला २ सरपंच तर ८ सदस्य, टाकेद खुर्द १ सदस्य, वाघेरे २ सरपंचपदासाठी तर १ सदस्यपदासाठी असे अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल करतांना शेकडो कार्यकर्ते व प्रमुखांच्या गर्दीमुळे तहसील कार्यालय परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. सुरेंद्र पालवे हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत.