एक हजार बीपीओ स्थापनेला गती द्यावी

By admin | Published: May 21, 2017 01:43 AM2017-05-21T01:43:56+5:302017-05-21T01:44:14+5:30

नाशिक : आय.टी. पार्कला प्रोत्साहन देण्यासाठी दळणवळण मंत्रालयाने काढलेल्या निविदात नाशिकसाठी एक हजार बी.पी.ओ. स्थापन करण्यात येणार आहेत.

Speed ​​up the installation of one thousand BPO | एक हजार बीपीओ स्थापनेला गती द्यावी

एक हजार बीपीओ स्थापनेला गती द्यावी

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारतातील टू टायर सिटीमध्ये आय.टी. पार्कला प्रोत्साहन देण्यासाठी दळणवळण व तांत्रिक व्यवहार मंत्रालयाने काढलेल्या निविदात नाशिकसाठी एक हजार बी.पी.ओ. स्थापन करण्यात येणार आहेत. या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी देऊनही हे काम वेळेत सुरू होत नसल्याने त्याकडे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी दळणवळण मंत्रालयाकडे केली.
आय.टी. इंडस्ट्रिज म्हटले की, राज्याबाहेर बेंगळुरू व राज्यात पुणे व मुंबई येथे प्रस्थापित आहेत. दळणवळण व तांत्रिक मंत्रालयाने भारतातील टू टायर सिटीला प्राधान्य देण्यासाठी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस आॅफ इंडियाने निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यानुसार टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेसने त्या निविदेत सहभाग घेतल्यानंतर त्या निविदेचा त्यांन आय.पी.ए. देण्यात आला होता.
त्यातून टी.सी.ए.ला महाराष्ट्रामध्ये ३९०० पैकी १८६० जागांचा आय.पी.ए. देण्यात आला होता. त्यातून टी.सी.एस.ला महाराष्ट्र राज्यातील नाशिकसाठी १००० बी.पी.ओ. जागांकरिता सहा महिन्यांच्या आत बी.पी.ओ.चे काम पूर्ण करण्याचे नमूद केले होते. परंतु गेली आठ ते नऊ महिन्यांपासून या बी.पी.ओ.चे काम हे अतिशय संथगतीने चालू आहे. त्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

Web Title: Speed ​​up the installation of one thousand BPO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.