एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:25 AM2018-02-23T00:25:53+5:302018-02-23T00:35:11+5:30

नाशिक : शहरवासीयांची दीर्घकालीन पाण्याची सोय करण्याबरोबरच मुंबई, दिल्ली औद्योगिक कॉरिडोअरसाठी शाश्वत उपलब्धता देणाºया एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात नियुक्त अधिकाºयांनी नाशिकमध्ये बैठक घेऊन माहिती घेतली. सदरचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना असल्या तरी डिसेंबर महिन्यापर्यंतच अहवाल पूर्ण करण्याबाबत अधिकाºयांनी आश्वस्त केले आहे.

Speed ​​motion | एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती

एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती

googlenewsNext
ठळक मुद्देडीपीआरसाठी बैठक डिसेंबरपर्यंत अहवाल सादर


नाशिक : शहरवासीयांची दीर्घकालीन पाण्याची सोय करण्याबरोबरच मुंबई, दिल्ली औद्योगिक कॉरिडोअरसाठी शाश्वत उपलब्धता देणाºया एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात नियुक्त अधिकाºयांनी नाशिकमध्ये बैठक घेऊन माहिती घेतली. सदरचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना असल्या तरी डिसेंबर महिन्यापर्यंतच अहवाल पूर्ण करण्याबाबत अधिकाºयांनी आश्वस्त केले आहे.
नाशिककर हक्काच्या पाण्याबाबत जागृक झाल्यानंतर दमणगंगा तसेच नार-पार प्रकल्पांचे पाणी नाशिकला वळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्या दरम्यान पेठ तालुक्यात एकदरे धरणाचा विषय पुढे आला. खासदार हेमंत गोडसे आणि जलचिंतन संस्थेचे राजेंद्र जाधव यांनी शासनाकडे याबाबत व्यवहार्य भूमिका मांडली होती. त्यातून दमणगंगा एकदरे लिंक प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. दमणगंगा नदीवर पेठ तालुक्यातील एकदरे पाच हजार दक्षलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. आठ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनद्वारे २१० मीटर उपसा करून उमरद गावाजवळ खिरा डोंगरावर हे पाणी आणण्यात येणार आहे. तेथून ५.५ किलो मीटर लांबीच्या बोगद्याद्वारे गंगापूर धरणात हे पाणी आणण्यात येणार आहे. त्यमाुळे पिण्यास, उद्योगास आणि सिंचनास पाणी उपलब्ध होणार असून त्यास तत्त्वत: मान्यता मिळल्यानंतर राष्टÑीय जलविकास अभिकरणाला विस्तृत प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम देण्यात आले आहे. या अभिकरणाचे हैदराबाद येथील मुख्य अभियंता एन. श्रीनिवासन, कार्यकारी अभियंता डी. के. शर्मा यांनी नाशिकमध्ये भेट दिली तसेच सिंचन भवनमध्ये बैठक घेतली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता मोरे जलचिंतनचे राजेंद्र जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपलब्ध धरणे तसेच प्रस्तावित धरणे याचा विचार करून कमीत कमी भूसंपादन त्यामुळे कमीत कमी पुनर्वसन करतानाच प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा तसेच वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या. मार्च महिन्यापर्यंत सदरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालावधी असला तरी डिसेंबर महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाºयांनी सांगितले.राष्टÑीय नद्याजोड प्रकल्पाअंतर्गत एकदरे आणि सिन्नर गारगोई-वैतरणा- कडवा-देवनदी लिंक प्रकल्पासह एकूण चार प्रकल्पांचा समावेश करण्याचे आश्वासन केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. एकदरे प्रकल्प झाल्यास नाशिक शहरासाठी २५०० दशलक्षघनफूट, तर सिंचनासाठी दीड हजार दशलक्षघनफूट पाणी उपलब्ध होणार आहे. केवळ पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कोरिडोअर नाशिकमधून स्थलांतरित करण्यात आले होते. परंतु आता या पाण्यामुळे दुसºया टप्प्यातील नाशिकचा समावेश निश्चित झाला आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सौरऊर्जेवर पाण्याचा उपसाएकदरे प्रकल्पासाठी ३२ तसेच सिन्नर तालुक्यातील गारगोई-वैतरणा-कडवा- देव नदी लिंक प्रकल्पात पाणी उपसा करण्यासाठी ३५ मेगावॉट वीज लागणार आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सौरऊर्जेवर पाण्याचा उपसा करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली आहे.

Web Title: Speed ​​motion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक