द्राक्ष घडांना पेपर आच्छादन लावण्याच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:15 PM2019-12-11T13:15:20+5:302019-12-11T13:15:30+5:30
वणी (प्रविण दोशी) : निर्यातक्षम द्राक्ष निर्यातीसाठी परिपूर्ण व परिपक्व प्रक्रि येत असताना द्राक्षाचा रंगबदलु नये याकरिता द्राक्षबागातील द्राक्षघडांना पेपर आच्छादन लावण्याच्या कामाला वेग आला आहे.
वणी (प्रविण दोशी) : निर्यातक्षम द्राक्ष निर्यातीसाठी परिपूर्ण व परिपक्व प्रक्रि येत असताना द्राक्षाचा रंगबदलु नये याकरिता द्राक्षबागातील द्राक्षघडांना पेपर आच्छादन लावण्याच्या कामाला वेग आला आहे. दिंडोरी तालुक्या त हजारो एकर द्राक्षबागा असुन यापैकी बहुतांशी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादितकरणार्या द्राक्ष बागा आहेत. युरोप रशिया, चायना बांगलादेश वइतर परदेशीय भागात द्राक्षे निर्यात करण्याचा दिंडोरी तालुक्याचानाव लौकिक आहे दरम्यान निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करण्यापेक्षा द्राक्षे निर्यात करताना अनेक चायणीप्रक्रि येच्या माध्यमातुन उत्पादकाना जावे लागते द्राक्षातील साखरेचे प्रमाण, आकारमान रंगवजन दर्जा याकडे विशेष लक्ष उत्पादकांना दयावे लागतेनिर्यातक्षम द्राक्षामधे या सर्व बाबीचा अंतर्भाव व्हावा याकरितासध्या नमुद द्राक्षांना पेपर आच्छादन लावण्याचे काम सुरू आहे एका एकर क्षेत्रात आच्छादनासाठी इंग्रजी पेपरची ३० ते ४० बंडल लागतात एका बंडलची किमत २०० रु पये असुन पेपर लावण्याची मजुरी एकरी दहा हजार इतकी आहे. तसेच मणी काढण्याची मजुरी एकरी ५ ते ७ हजार रूपये होते. पेठ सुरगाण्याशी भागाबरोबर स्थानिक मजुरांकडुन हे काम करवुनघेण्यात येते अशी माहिती निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक जयवंतराव देशमुख यानी दिली. निर्यात होणाऱ्या द्राक्षाचा रंग हिरवा असावा लागतो. पेपर आच्छादन केले तरच हा रंग टिकुन राहतो. त्यामुळे १८ ते २० ब्रिक्स (साखरेचे) प्रमाण राहुन नैसर्गिपणा टिकुन राहतो. दरम्यान एक महिन्याच्या कालावधीपर्यंत आच्छादन ठेवावे लागते. दरम्यान, स्थानिक ठिकाणाबरोबर परराज्यात द्राक्षाविक्री करावयाची असल्यास पिवळसर रंगाची द्राक्षे विक्र ीसाठी योग्य मानन्यात येतात त्यात साखरेचे प्रमाण २२ ते २४ असावे लागतेअशी माहिती उत्पादक गणेश देशमुख यांनी दिली. निर्यातीसाठी १६ ते २० इतके आकारमान आवश्यक असते. निर्यातीसाठी ५ किलो द्राक्षांचे नमुने तपासणीसाठी हैदराबाद, पुणे ठाणे येथे पाठविण्यात येतात, अशी माहिती उत्पादक बाळासाहेब पुरकर यांनी दिली.