तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन काढण्यास वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:07 AM2018-11-06T01:07:00+5:302018-11-06T01:07:27+5:30
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत.
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत. एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी, माडसांगवी या भागात सर्वत्र सोयाबीनचे पीक बºयापैकी आले आहे. काही ठिकाणी उशिरा पेरलेले सोयाबीन अजूनही पिवळसर असल्याने साधारणत: आठवडाभराने कापणीस येईल. तर काही ठिकाणी सोयाबीन कापणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हल्ली शेतकºयांकडून यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन काढले जाते. ज्यांनी सोयाबीन काढले त्यांनी आॅक्टोबरच्या कडक उन्हात वाळवून गोण्या भरून ठेवल्या आहेत. परिसरातील अनेक शेतकरी सिन्नरफाटा, नाशिक पेठरोड मार्केट, पिंपळगाव अथवा सायखेडा मार्केटला आपापल्या सोईने सोयाबीन विक्रीसाठी नेत असून, सध्या तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत. काही व्यापारी थेट शेतातूनच २५०० ते २८०० रुपये क्ंिवटलने खरेदी करीत आहेत.
शेतकºयांना भाजीपाल्याचा आधार
परिसरातील शेतकºयांना सध्या भाजीपाला पिकांचा आधार आहे. त्यातल्या त्यात पालकाची भाजी मुबलक प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी पालकाची भाजी सिन्नर फाटा मार्केट, जेलरोड शनिमंदिर, नोट प्रेस समोरचे भाजी मार्केट येथे जुडीने व्यापारी भाजी खरेदी करीत आहेत.
४साधारणत: ७०० ते ८०० रुपये शेकडा जुडी पालकाचा दर आहे. काही व्यापारी थेट शेतकºयांच्या शेतातूनच पालक ठोक पद्धतीने खरेदी करतात. त्यासाठी ५०० ते ६०० रुपये दर आहे. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंतचा कालावधी पालकासाठी जास्त मागणीचा असतो, असे जाणकार शेतकरी सांगतात.
रब्बीच्या पूर्व मशागतीला वेग
सोयाबीन काढून झाल्यानंतर शेत नांगरुन ते रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा, ज्वारी पिकांची तयारी शेतकरी करीत आहेत. यंदा परतीच्या पावसाने ओढ दिली असली तरी या भागातील शेतकºयांना दारणा व गोदावरी नदीच्या पाण्याचा थोडाफार आधार आहे. त्यातून खरिपाची पिके जगली असली तरी रब्बीच्या पिकांना मात्र ताण पडू शकतो. पावसाची कमतरता असल्याने विहिरींना यंदा कमी पाणी उतरले. धरणातील पाण्याचा साठा कमी असल्याने दोन्ही नद्यांना पाणी कमी प्रमाणात राहील. त्यामुळे रब्बीच्या पिकांना ताण पडेल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.