त्र्यंबकेश्वर तालुक्यात घरे दुरुस्तीस वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 09:11 PM2020-06-04T21:11:17+5:302020-06-05T00:25:37+5:30

त्र्यंबकेश्वर : पावसाळा येऊन ठेपला असताना तालुक्यात आपली घरे, गोठे, पडवी व चार महिन्याचे इंधन लाकुडफाटा साठवण्यासाठी आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे.

Speed of repair of houses in Trimbakeshwar taluka | त्र्यंबकेश्वर तालुक्यात घरे दुरुस्तीस वेग

त्र्यंबकेश्वर तालुक्यात घरे दुरुस्तीस वेग

Next

त्र्यंबकेश्वर : पावसाळा येऊन ठेपला असताना तालुक्यात आपली घरे, गोठे, पडवी व चार महिन्याचे इंधन लाकुडफाटा साठवण्यासाठी आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. वाड्या पाड्यावर राहणा-यां पासुन ते अगदी शहरातील बंगल्याची देखील डागडुजी होत आहे. मात्र खेड्या पाड्यातील गरीबांच्या घरांची डागडुजी वेगळी असते. काही लोकांच्या घरावर कुहीटाचे छप्पर असते. कुहीट तयार करतांना गंधन नावाचे नदीच्या किनारी जाड गवत असते. छपराच साठा तयार झाला की त्यावर कुड अंथरतात.त्यावर गंधन गवत दाट स्वरु पात पसरु न त्यावर पळसाची पाने अंथरु न ती कामट्यांनी बांधतात. परत आपल्याकडील तनस किंवा गवताचा थर पसरु न वरती प्लॅस्टिकचे लांब रु ंद कापड बांधतात. मग कुणी कुडाच्या भिंती तर कुणी दगड विटाच्या भिंती तर कुणी जुने विकत घेतलेल्या पत्र्याच्या भिंती तयार करतना दिसत आहेत.

Web Title: Speed of repair of houses in Trimbakeshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक