अंदरसूल परिसरात पेरण्यांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 09:07 PM2020-06-13T21:07:52+5:302020-06-14T01:33:43+5:30
अंदरसूल : गावच्या उत्तर-पूर्व भागासह परिसरात पेरण्यांना वेग आला आहे. गवंडगाव, सुरेगावरस्ता, बोकटे, देवळाणे, खामगाव, देवठाण, भुलेगाव, पिंपळखुटे, पांजरवाडी, तळवाडे, गारखेडे आदी परिसरात निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. आठवड्यापूर्वी रोहिणी नक्षत्राच्या पावसाने परिसरात हजेरी लावली होती.
अंदरसूल : गावच्या उत्तर-पूर्व भागासह परिसरात पेरण्यांना वेग आला आहे. गवंडगाव, सुरेगावरस्ता, बोकटे, देवळाणे, खामगाव, देवठाण, भुलेगाव, पिंपळखुटे, पांजरवाडी, तळवाडे, गारखेडे आदी परिसरात निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. आठवड्यापूर्वी रोहिणी नक्षत्राच्या पावसाने परिसरात हजेरी लावली होती.
या पावसाच्या ओलीवर काही शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, मूग व कांदे लागवड केली आहे. त्यात दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाची दमदार सुरु वात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. शुक्रवारीही अंदरसूल परिसरात मान्सूनपूर्व तथा मृगाचा पाऊस बºयापैकी झाल्याने खते, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकºयांनी कृषी केंद्रांवर गर्दी केली आहे. येवला तालुक्यासह जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने पेरण्यांना प्रारंभ करण्यात आला आहे.
------------------------
विंचुरीदळवी परिसरात
पावसाचे आगमन
विंचुरी दळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरीदळवी व पांढुर्ली परिसरात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी खरीप पिकाच्या कामाला लागला आहे. सकाळपासूनच ढगाळ व दमट वातावरण असल्यामुळे दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावर्षी मान्सून पावसाने सर्वत्र वेळेवर हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून, खरीप पीकपूर्व मशागतीला वेग आला आहे. परिसरामध्ये टोमॅटो, सोयाबीन, मका, भात पिके प्रामुख्याने घेतली जातात. त्यामुळे त्यासाठी लागणारे बी-बियाणे, खते, औषधे, इतर साधन सामग्रीची जमवाजमव करण्यात बळीराजा गुंतला आहे.
------------------
कोरोनाच्या सावटाखाली गेल्या २ ते ३ महिन्यांत बळीराजाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यात खते, बी- बियाणे यांचे दर वाढल्याने बळीराजाला खरीप पिकाच्या भांडवलासाठी तडजोड करावी लागत आहे. निसर्गाने वेळेवर साथ दिल्यामुळे या सर्वांतून वाट काढत बळीराजाने पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे.