सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती द्या

By admin | Published: July 19, 2016 12:16 AM2016-07-19T00:16:17+5:302016-07-19T00:18:37+5:30

सुभाष भामरे : सटाणा येथे अधिकाऱ्यांची बैठक

Speed ​​up the work of irrigation projects | सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती द्या

सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती द्या

Next

 सटाणा : बागलाणमधील अपूर्ण सिंचन प्रकल्प व सटाणा शहराचा बायपास प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत मीही शांत बसणार नाही आणि तुम्हालाही शांत बसू देणार नाही, असे स्पष्ट करत केळझर चारी क्र. ८ चे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले. केळझर चारी
क्र मांक ८ साठी केवळ इन्स्पेक्शन नोटची अपूर्णता असून, कार्यकारी अभियंता अलका आहिरराव
यांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही डॉ. भामरे यांनी
दिले.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवारी बागलाणवासीयांचा सत्कार स्वीकारून तालुकावासीयांनी केलेल्या प्रमुख मागण्यांची दखल घेतली. रात्री उशिरा मांगीतुंगी येथील ज्ञानमती माताजी यांचे दर्शन घेतले. नंतर ताहाराबाद शासकीय विश्रामगृहावर जलसंपदा, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची बागलाणमधील अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि सटाणा बायपास रस्त्यासंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली.

Web Title: Speed ​​up the work of irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.