वाद्यांच्या जुगलबंदीने श्रोते मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:39 AM2018-04-15T00:39:38+5:302018-04-15T00:39:38+5:30
नाशिक : ‘उत्सव कलेचा, उगवत्या ताऱ्यांचा’ या उपक्रमाचे सहावे पुष्प शनिवारी (दि. १४) उत्सव हॉटेलच्या प्रांगणात पहाटे उत्साहात पार पडले.
नाशिक : ‘उत्सव कलेचा, उगवत्या ताऱ्यांचा’ या उपक्रमाचे सहावे पुष्प शनिवारी (दि. १४) उत्सव हॉटेलच्या प्रांगणात पहाटे उत्साहात पार पडले. याप्रसंगी वैष्णवी जोशी यांनी बासरी, तर वैष्णवी भडकमकर यांनी तबला वादनाद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अपर्णा क्षीरसागर यांनी व्हायोलियनवादन केले. प्रारंभी राग अहिरभैरव सादर करण्यात आला. त्यानंतर पहाडी रागातील धून व मांड रागातील ‘केसरिया बालमा पधारो म्हारो देस’ सादर करण्यात आले. विलंबित लयीतील ही वाद्य वादनाची जुगलबंदी जवळपास दीड तास रंगली. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यास प्रतिसाद दिला. याप्रसंगी प्रख्यात वास्तुविशारद संजय पाटील, अनिल दैठणकर, विजयालक्ष्मी मणेरीकर, मिलिंद कुलकर्णी, विनायक रानडे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीतप्रेमी नाशिककर हे उत्सवप्रेमी आहेत. दिग्गजांच्या संगीताचा ते आस्वाद घेतात. मात्र नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांची कला थोरा-मोठ्यांपुढे सादर व्हावी, प्रसन्न वेळी ती सादर करण्याची त्यांना संधी मिळावी या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे.