२३ लाखांचा खर्च दडविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:35 AM2019-03-04T00:35:04+5:302019-03-04T00:35:52+5:30
सटाणा : शहरातील पाणीपुरवठा विहिरीवर करण्यात आलेल्या २३ लाख रुपयांच्या खर्चाची रक्कम सटाणा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत दडविल्याचे उघडकीस आल्याने फिर्यादी अभियंत्यासह अन्य अधिकारी अडचणीत सापडले आहेत. दिलेल्या फिर्यादीत ही लाखोंची रक्कम दडविली गेल्याची तक्र ार पालिकेचे नगरसेवक आरीफ शेख यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
सटाणा : शहरातील पाणीपुरवठा विहिरीवर करण्यात आलेल्या २३ लाख रुपयांच्या खर्चाची रक्कम सटाणा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत दडविल्याचे उघडकीस आल्याने फिर्यादी अभियंत्यासह अन्य अधिकारी अडचणीत सापडले आहेत. दिलेल्या फिर्यादीत ही लाखोंची रक्कम दडविली गेल्याची तक्र ार पालिकेचे नगरसेवक आरीफ शेख यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा पाणीपुरवठा योजनेंतर्गत गिरणा नदीकाठावर सत्तर लाख रुपये खर्चून विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर २३ लाख रुपये खर्चून या विहिरीचे पुन्हा खोलीकरण करण्यात आले. यानंतर काही महिन्यातच हे बांधकाम ढासळले. या प्रकरणी सटाणा पोलिसांत पालिकेचे अभियंता चेतन विसपुते यांनी सत्तर लाख रु पयांची फसवणूक केल्या प्रकरणी मालेगाव येथील विहीर बांधकामाचे तांत्रिक सल्लागार परशुराम बी. देवरे व त्यांचा मुलगा परेश देवरे \यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वास्तविक ९३ लाख रुपयांची फसवणूक झाली असताना फिर्यादीत २३ लाख रुपयांचा खर्च दडविला गेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत नगरसेवक आरीफ शेख यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकरी राधाकृष्णन बी., सटाणा पोलीस ठाणे यांना लेखी स्वरूपात तक्र ार केल्याने अभियंत्यांसह तत्कालीन मुख्य अधिकारी, तत्कालीन नगराध्यक्ष संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.बनावट अहवालाद्वारे काढली बिले या विहिरीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाºया मालाची शासकीय यंत्रणेमार्फत तपासणी होणे आवश्यक असताना संबंधितांनी धुळे येथील खासगी यंत्रणेमार्फत तपासणी करून त्या तपासणी अहवालावर वेळोवेळी बिले काढली. त्यानंतर विहिरीचे बांधकाम चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. याबाबत शासकीय यंत्रणा नाशिक यांच्याकडून त्रयस्थ लेखा परीक्षण तपासणी अहवाल प्राप्त करून तो नगरपरिषदेला सादर करणे बंधकारक होते. मात्र हा अहवाल अनुकूल नसल्यामुळे परशुराम देवरे यांचा मुलगा परेश याने त्यांचा कोणताही संबध नसताना परस्पर शासकीय तंत्रनिकेतन नाशिक यांच्याकडील मूळ अहवाल नगरपालिकेस प्राप्त होऊ नये म्हणून दडवून ठेवला व धुळे येथील खासगी संस्थेकडून विहिरीचे झालेले बांधकाम अनुकूल व योग्य असल्याचा बनावट अहवाल प्राप्त करून त्या अहवालाच्या आधारे बिले काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.अनामत रक्कम दिलीच कशी ? विहीर बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊनही पालिका प्रशासनाने त्या ठेकेदाराची पूर्ण देयके तर दिलीच, परंतु राजकीय दबाव आणून काही लाखांत असलेली अनामत रक्कम अदा केल्याने संबंधित अधिकारी संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. दरम्यान पालिका प्रशासनाने सत्तर लाख रु पयांचे विहीर बांधकाम केल्यानंतर याच विहिरीच्या खोलीकरणासाठी २३ लाख रु पये मंजूर करून खोलीकरण करण्यात आल्याचे नगरसेवक मुन्ना शेख यांनी सांगितले. विहीर खोलीकरणात २३ लाख रु पयांचा भ्रष्टाचार झाला असताना संबंधित अधिकाऱ्यांनी हे प्रकरण का दडपले, असा सवाल करत याबाबत आपण जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त यांच्याकडे तक्र ार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.