वणी - सापुतारा रस्ता बनला व्यावसायिक उलाढालीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:49 PM2019-11-26T22:49:09+5:302019-11-26T22:50:33+5:30

वणी : वणी - सापुतारा रस्ता हा टमाटा व कांदा खरेदी-विक्र ीच्या व्यवहारामुळे उलाढालीचे केंद्र बनला असून, कांदा व टमाटा विक्र ीसाठी आपला माल या रस्त्यावरून आणणाऱ्या उत्पादकामुळे वर्दळ वाढली आहे.

Spice: Increase in purchase of onion, tomato | वणी - सापुतारा रस्ता बनला व्यावसायिक उलाढालीचे केंद्र

वणी - सापुतारा रस्ता बनला व्यावसायिक उलाढालीचे केंद्र

Next
ठळक मुद्देवर्दळ : कांदा, टमाट्याच्या खरेदीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी - सापुतारा रस्ता हा टमाटा व कांदा खरेदी-विक्र ीच्या व्यवहारामुळे उलाढालीचे केंद्र बनला असून, कांदा व टमाटा विक्र ीसाठी आपला माल या रस्त्यावरून आणणाऱ्या उत्पादकामुळे वर्दळ वाढली आहे.
वणी - सापुतारा रस्त्यावर दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार आहे. या ठिकाणी सध्या टमाटा खरेदी-विक्री सुरू असते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास टमाटा खरेदी-विक्र ी व्यवहारास प्रारंभ होतो. आवकेच्या उपलब्धतेनुसार सायंकाळपर्यंत तसेच कधी उशिराही व्यवहार चालतात. तसेच या मार्गावर सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील खोरीफाटा येथे टमाटा खरेदी-विक्रीचे दुसरे मोठे केंद्र आहे. टॅÑक्टर, पिकअप, छोटा हत्ती व तत्सम वाहनांतून टमाटा विक्र ीसाठी आणण्यात येतो. वाहतुकीसाठी याच मार्गाचा वापर प्रामुख्याने करण्यात येतो तसेच वणी शहरातील उपबाजारात कांदा खरेदी - विक्र ी सुरू आहे. तेजीचे वातावरण कांदा व्यवहारात असल्याने उत्पादकांचाही कांदा विक्र ीला सकारात्मक प्रतिसाद आहे. बहुतांशी उत्पादक याच मार्गाचा वापर कांदा वाहतुकीसाठी करतात तसेच काही व्यापाऱ्यांच्या कांदाचाळी या मार्गावर रस्त्यालगत असल्याने परराज्यात कांदा खरेदी करणारे व्यावसायिकसुद्धा या मार्गाचा वापर करतात त्यामुळे सततची वाहतूक, वर्दळ त्यानिमित्ताने होणारी व्यावसायिक उलाढाल यामुळे वणी-सापुतारा रस्ता व्यावसायिक उलाढालीचे केंद्र बनला आहे.वणी उपबाजारापेक्षा या ठिकाणी आवक तुलनात्मक जास्त असते. दिल्ली, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश व इतर परराज्यांतील सुमारे ४० ते ५० व्यापारी या ठिकाणी टमाटा खरेदी करतात. सकाळी ९ वाजता टमाट्याचे व्यवहार सुरू होतात. सुमारे ४० ते ५० गावे, खेडेपाडे येथील उत्पादक आपला माल या ठिकाणी विक्र ीसाठी आणतात.

Web Title: Spice: Increase in purchase of onion, tomato

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.