धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:15 AM2017-10-01T00:15:24+5:302017-10-01T00:15:33+5:30

६१वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व बौद्ध स्मारकाचा वर्धापन दिन पांडवलेणीलगत असलेल्या बौद्ध स्मारकात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट, महानगरपालिका व सम्राट सोशल ग्रुप पाथर्डीगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले.

 Spiral Enlightenment Day | धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

Next

पाथर्डी फाटा : ६१वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व बौद्ध स्मारकाचा वर्धापन दिन पांडवलेणीलगत असलेल्या बौद्ध स्मारकात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट, महानगरपालिका व सम्राट सोशल ग्रुप पाथर्डीगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमांची सुरुवात महापौर रंजना भानसी व आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर बौद्धस्तुपातील भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पूजन करून मान्यवरांनी बुद्धवंदना समर्पित केली. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, शहर सुधार समितीचे सभापती भगवान दोंदे, विधी समिती उपसभापती राकेश दोंदे, भाजपा गटनेते संभाजी मोरु स्कर, नगरसेवक दीक्षा लोंढे, कविता कर्डक, एकनाथ नवले, संजय नवले, पोलीस उपायुक्त श्रीकांत कोकाटे, सचिन गोरे आदी मान्यवर उपस्थित होते, भन्ते सुगत यांनी उपस्थितांचे स्वागत करून धम्मवंदना सादर केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मनपा व बिटको हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बँक आॅफ महाराष्ट्र, एससी, एसटी अँड ओबीसी एम्प्लॉइज असोसिएशन मनपा व शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट आणि सम्राट सोशल ग्रुप यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा आयोजित नाशिकरोड येथील श्रामणेर शिबिराचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत येथे करण्यात आला.
पावसातही दांडगा उत्साह
दुपारच्या सुमारास जोरदार वारा व पाऊस कोसळल्याने नागरिक व व्यावसायिकांचे मोठे हाल झाले. व्यावसायिकांचे मंडप वाºयाने उडून गेले तर अनेकांच्या वस्तू भिजून मोठे नुकसान झाले. पावसानंतरही भाविकांची गर्दी स्मारकाकडे येऊ लागल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले. दुपारनंतरच्या सत्रात शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित जाहीर धम्मसभेवरही पावसामुळे परिणाम झाला असला तरी भाविकांनी उभे राहून विचार ऐकले. यावेळी उपस्थित भाविकांना वाबीस प्रतिज्ञा देऊन धम्मदीक्षा देण्यात आली. परिसरात अनेक संस्था संघटनांनी मंडप उभारून अन्नदान, प्रबोधनाचे कार्यक्र म घेतले. प्रथमच येथे वधूवर सूचक मंडळांचेही स्टॉल लागलेले पाहायला मिळाले.

Web Title:  Spiral Enlightenment Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.