लासलगावी बंदला उस्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:05 PM2018-08-09T13:05:50+5:302018-08-09T13:06:02+5:30
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध शाळा तसेच बससेवा बंद असल्याने व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता.
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध शाळा तसेच बससेवा बंद असल्याने व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. येथील सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला. मंगळवारी लासलगाव आगाराच्या बसेस आगाराबाहेर न गेल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. अचानक बस न आल्याने शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी व प्रवाश्यांचीही कोंडी झाली. ग्रामीण भागातून शहरात येण्याचे महत्वाचे माध्यम एस टी आहे आणि हिच वाहतूक बंद झाल्याने सारे व्यवहार ठप्प झाले. गुरूवारी सकाळपासून एकही बस लासलगाव स्थानकातून सुटलेली नाही. ग्रामीण भागातून शहरात येणाºया प्रवाशांचे हाल झाले. लासलगाव एसटीच्या आगारातून साधारणपणे एका दिवसाला सोळा हजार किलोमीटर बस चालते तसेच एका दिवसाला चार ते पाच लाखापर्यंत उत्पन्न जमा होते मात्र एसटी वाहतूक ठप्प झाल्याने उत्पन्न बुडाले आहे .छत्रपती शिवाजी चौक , मेन रोड,विंचूर रोड, कोटमगाव रोड, स्टेशन रोडयासह सर्व परीसर बंद आहे. लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक शिवकुमार पांढरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.