सिन्नर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 04:35 PM2020-08-30T16:35:29+5:302020-08-30T16:36:03+5:30
सिन्नर: गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सिन्नर: गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
29 ऑगस्ट हा दिन संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने सिन्नरमहाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये दहा किलोमीटर सायकल चालविणे, दहा हजार स्टेप चालणे या क्रीडा प्रकारात महाविद्यालयातील खेळाडू व शिक्षकांनी सहभाग नोंदवुन स्पर्धेची शोभा वाढविली. या कार्यक्रमासाठी मविप्र समाज संस्थेचे संचालक हेमंत वाजे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धा महाविद्यालयाचे क्रीडाप्रेमी व निसर्गप्रेमी प्राचार्य डॉ. पी व्ही रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. सायकलिंग स्पर्धेत विज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक सी जी बर्वे, सोनवणे प्रा. मनिष गुजराती यांनी सहभाग नोंदविला. महाविद्यालयाचे खेळाडू विविध क्रीडा प्रकारात राज्य राष्ट्रीय विद्यापीठ स्तरावर विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयातील कार्तिक एस पाटील राष्ट्रीय खेळाडू अक्षदा जाधव खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे क्रीडाप्रेमी प्राचार्य डॉ. रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ डी एम जाधव, आर्वी पवार, एस के गायकवाड, क्रीडा संचालक प्रा. कांदळकर, प्रा. पी एम खैरनार, उपेंद्र पठाडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वीतेसाठी भर घातली.