आत्मा मालिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:19 AM2021-09-08T04:19:05+5:302021-09-08T04:19:05+5:30
जळगाव नेऊर : पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात ...
जळगाव नेऊर : पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे उपस्थित होते. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सदर कार्यक्रमप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी शिक्षकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा साकारत अध्यापनाचे कार्य सुरळीत पार पाडले. ‘मानवी जीवनातील शिक्षकांचे महत्त्व व समाजात असलेली शिक्षकांची गरज’ या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. शिक्षक प्रवीण निंबाळकर, शीतल महाले, नरेंद्र म्हसे यांनी मनोगत व्यक्त केले. शरद ढोणे यांनी ‘गुरुजी’ या विषयावर आधारित कविता सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिका कदम हिने केले. मुख्याध्यापक योगेश सोनवणे यांनी आभार मानले.
(०६ जळगावनेऊर १)
पुरणगाव येथील आत्मा मालिक गुरुकुलात शिक्षक दिनानिमित्त डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना हनुमंत भोंगळे, प्राचार्य पाटील आणि सोनवणे.