जीवनात आनंदप्राप्तीसाठी आध्यात्माची गरज : देखणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:48 AM2018-05-29T00:48:09+5:302018-05-29T00:48:09+5:30
अनेकजण सुख व आनंदप्राप्तीसाठी पैसा मिळविण्यासाठी धडपड करीत असतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही लाखोंच्या संख्येने काम करणारे लोक आहे. त्यांना चांगल्या पैशासोबत गाडी, बंगला व अन्य सुख सुविधांही मिळतात, परंतु त्यांनी ते सुखी होत असले तरी त्यांना आनंद मिळतोच असे नाही.
नाशिक : अनेकजण सुख व आनंदप्राप्तीसाठी पैसा मिळविण्यासाठी धडपड करीत असतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही लाखोंच्या संख्येने काम करणारे लोक आहे. त्यांना चांगल्या पैशासोबत गाडी, बंगला व अन्य सुख सुविधांही मिळतात, परंतु त्यांनी ते सुखी होत असले तरी त्यांना आनंद मिळतोच असे नाही. जीवनात अधिक पैसा व श्रीमंती मिळाली म्हणजे आनंदाची प्राप्ती होऊ शकेल असे नाही, तर जीवनात खऱ्या अर्थाने सुख व आनंद मिळवायचा असेल तर अध्यात्माची गोडी लावली पाहिजे, असे मत युवा व्याख्याते भावार्थ देखणे यांनी व्यक्त केले. गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत सोमवारी (दि.२८) डॉ. देखणे यांनी पुष्प गुंफले. दिवंगत डॉ. विष्णू महादेव गोगटे यांच्या स्मृतीत ‘कॉर्पोरेट कर्मयोग’ विषयावर व्याख्यान देताना देखणे यांनी कॉर्पोरेट जगात काम करतानाही आधात्माचा कानमंत्र उपस्थिताना दिला, ते म्हणाले, अनेक व्यक्ती जीवनात मोठ्या प्रमाणात पैसा मिळवून सर्व सोयी-सुविधा विकत घेतात. परंतु त्यातून त्यांना खरे आत्मसुख तथा आनंद मिळत नाही. याऊलट कामाचा तणाव, वेळेचा अभाव, संघर्ष आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आध्यात्मच सुख मिळवून देते. तसेच आध्यात्माच्या माध्यमातून आपण जे काम करतो त्यातही आनंदही निर्माण होतो. म्हणूच आजच्या कॉर्पोरेट युगात कर्म करत असताना त्याला आध्यात्माचीही जोड देण्याची गरज असल्याचे मत देखणे यांनी मांडले.
आजचे व्याख्यान , वक्ते : लक्ष्मीकांत देशमुख , विषय : उच्च शिक्षणाची गुणवत्ता-एक मोठे प्रश्नचिन्ह