जवानांच्या पाठीशी आध्यात्मिक शक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:12 AM2017-09-25T00:12:44+5:302017-09-25T00:12:50+5:30
देशाच्या सीमेवर आपले जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारतमातेचे रक्षण करीत आहेत. गुरुमाउलींच्या आशीर्वादाने आज आपण हजारो सेवेकºयांनी दुर्गासप्तशतीचा पाठ करून या जवानांच्या पाठीशी आध्यात्मिक शक्ती उभी करून त्यांचे आत्मबल वाढविण्याचे काम केले आहे. जिवाची पर्वा न करता मायभूमीची सेवा करणाºया सैनिकांच्या पाठीशी अदृश्य ताकद उभी करण्यासाठी समर्थ सेवेकरी सातत्याने भगीरथ प्रयत्न करीत असून, गुरुमाउलींनी कायम समाज राष्ट्रोद्धाराचा ध्यासच घेतला आहे, असे गौरवोद्गार भारताचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी काढले.
त्र्यंबकेश्वर : देशाच्या सीमेवर आपले जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारतमातेचे रक्षण करीत आहेत. गुरुमाउलींच्या आशीर्वादाने आज आपण हजारो सेवेकºयांनी दुर्गासप्तशतीचा पाठ करून या जवानांच्या पाठीशी आध्यात्मिक शक्ती उभी करून त्यांचे आत्मबल वाढविण्याचे काम केले आहे. जिवाची पर्वा न करता मायभूमीची सेवा करणाºया सैनिकांच्या पाठीशी अदृश्य ताकद उभी करण्यासाठी समर्थ सेवेकरी सातत्याने भगीरथ प्रयत्न करीत असून, गुरुमाउलींनी कायम समाज राष्ट्रोद्धाराचा ध्यासच घेतला आहे, असे गौरवोद्गार भारताचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी काढले. संभाव्य महायुद्ध टळावे, चीन- पाकिस्तानसारख्या शत्रू राष्टÑांना सद्बुद्धी सुचावी, या राष्टÑांपासून भारतमातेचे रक्षण होऊन आपली सरशी व्हावी, विविध नैसर्गिक मानवनिर्मित आपत्तीपासून राष्टÑाचे रक्षण व्हावे या उदात्त हेतूने गुरुमाउली प.पू. अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने त्र्यंबकेश्वर येथील समर्थ गुरुपीठात बगलामुखी मंत्र्यांसह सव्वालाख दुर्गासप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लाखाहून अधिक स्त्री-पुरुष सेवेकºयांशी संवाद साधताना भारताचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे बोलत होते. व्यासपीठावर आमदार सीमाताई हिरे, त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्ष तृप्ती धारणे, डॉ. प्रशांत पाटील, राजाराम पानगव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सेवा : गुरुमाउली
भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून ही सेवा आपण हाती घेतली आहे. उत्तर वायव्य सीमेवरील शत्रूराष्टÑाची आपल्यावर कायमच वक्रदृष्टी असते. आज जगाचा विनाश करू शकतील अशी शस्त्रास्त्रे सर्वत्र तैनात आहेत. तिसºया महायुद्धाकडे कळत नकळत वाटचाल सुरू आहे. देशांतर्गत दहशतवाद, अतिरेकी कारवाया सुरूच आहेत. दुष्काळ, जलप्रलय, आजाराच्या साथी, शेतकरी तरुणांचे प्रश्न अशा सर्व समस्यांमधून भारतमातेची सुटका व्हावी म्हणून आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवा हाती घेतली असून, माता भगवती निश्चितच धावून येईल, असा विश्वास गुरुमाउली प.पू. अण्णासाहेब यांनी व्यक्त केला. भारतमातेच्या रक्षणार्थ झालेल्या या सोहळ्यात यशवंतराव चव्हाणांचे वारसदार म्हणजेच संरक्षणमंत्री भामरे उपस्थित झाले हा दुग्धशर्करा योगच आहे असेही गुरुमाऊली म्हणाले.
स्वच्छता अभियान
गुरुपीठात डॉ. सुभाष भामरे, गुरुमाउली, चंद्रकांतदादा मोरे, आमदार हिरे, नगराध्यक्ष तृप्ती धारणेंसह हजारो सेवेकºयांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. मोदींचा ‘स्वच्छ भारताचा संदेश’ घरोघर सेवेकºयांनी पोहोचवावा, असे आवाहन भामरे यांनी केले. तर हा शुभारंभ असून, आपापल्या गावात सेवेकºयांनी कायमस्वरूपी ही मोहीम राबवावी असा संदेश अण्णासाहेबांनी दिला.