अध्यात्माने माणसात कौशल्य रुजते - तिदमे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:40 AM2019-05-19T00:40:04+5:302019-05-19T00:40:14+5:30
प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून सदाचार संपन्न जीवन जगण्याची प्रेरणा, सामर्थ्य व कौशल्य माणसात रुजविते त्याला अध्यात्म म्हणतात, असे प्रतिपादन लेखक सावळीराम तिदमे यांनी केले.
सिडको : प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून सदाचार संपन्न जीवन जगण्याची प्रेरणा, सामर्थ्य व कौशल्य माणसात रुजविते त्याला अध्यात्म म्हणतात, असे प्रतिपादन लेखक सावळीराम तिदमे यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक मंडळ, सूर्योदय परिवार व लोकमान्य वाचनालयातर्फे कै. लक्ष्मीबाई महाले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत साबुदाण्यात हरवले अध्यात्म या विषयावर तिदमे यांनी बोलत होते. व्यासपीठावर नानासाहेब महाले, लेखक संजय गोराडे, प्रा. डॉ. दिलीप पवार, किरण सोनार, देवराम सौंदाणे, रमेश सोनवणे, विजय गोसावी आदी उपस्थित होते. तिदमे पुढे म्हणाले की जीवनाच्या क्षणाक्षणात व कणाकणात अध्यात्म ओतप्रोत भरलेले आहे. त्यासाठी माणसाने मन, बुद्धी व हृदयाचे दरवाजे उघडायला हवेत. मन, बुद्धी, चित्त व ज्ञानेंद्रियांना हृदयस्थ आत्म्याशी जोडले पाहिजे. यासंदर्भात समर्पक उदाहरणे देऊन अध्यात्माचे तत्त्व, सत्व व महात्म्य तिदमे यांनी पटवून दिले. परिचय नंदकुमार दुसानीस यांनी केला. स्वागत प्रकाश काळे यांनी तर रामदास शिंपी यांनी आभार मानले.