थुंकीबहाद्दरांकडून सर्रास पिचकाऱ्या सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:56+5:302021-03-24T04:13:56+5:30

शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना बहुतांश नागरिकांकडून थुंकीचे पाट रंगविले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात ...

The spitting from the spitters continues | थुंकीबहाद्दरांकडून सर्रास पिचकाऱ्या सुरूच

थुंकीबहाद्दरांकडून सर्रास पिचकाऱ्या सुरूच

Next

शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना बहुतांश नागरिकांकडून थुंकीचे पाट रंगविले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे. सर्वांना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तरीही बहुतांश फेरीवाले, ठिकठिकाणी उभे राहणारे फळविक्रेते, खेळणी विक्रेत्यांसह रिक्षा चालकांकडून मास्क सर्रासपणे तोंडावर न लावता, हनुवटीवर ठेवत ‘तलफ’ भागवित रस्त्यावर थुंकताना शहरात आढळून येतात. थुंकणाऱ्यांमध्ये शहर व परिसरात वावरणाऱ्या रिक्षा चालकांची आघाडी दिसून येते. या थुंकीबहाद्दरांकडून कसलाही विचार न करता, अगदी बेशिस्तपणे ‌थुंकताना नजरेस पडतात. हे थुंकीबहाद्दर कोराेनाचे ‘सुपर स्प्रेडर’ही ठरू शकतात. यामुळे प्रशासनाने थुंकीबहाद्दरांना वेळीच आवरणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. या थुंकीबहाद्दरांमुळेही शहरात कोरोना वाढीला हातभार लागत असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे थुंकीबहाद्दरांवर शहर व परिसरातील विविध चौकांमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांनीच गुन्हे दाखल करावे, अशीही मागणी नाशिकरांकडून होत आहे.

Web Title: The spitting from the spitters continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.