एकता पॅनलमध्ये फूट; चर्चा निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:52 AM2018-07-24T00:52:05+5:302018-07-24T00:52:25+5:30

सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने समेटासाठी एक दिवसाची मुदत घेऊनही दिवसभर चाललेल्या चर्चेच्या गुºहाळातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एकताविरुद्ध एकताविरुद्ध उद्योग विकास अशा तीन पॅनलमध्ये आता सरळसरळ लढत होणार आहे. माघारीनंतर ३३ जागांसाठी ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Split into solidarity panel; Discuss incompatible | एकता पॅनलमध्ये फूट; चर्चा निष्फळ

एकता पॅनलमध्ये फूट; चर्चा निष्फळ

Next

सातपूर : सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने समेटासाठी एक दिवसाची मुदत घेऊनही दिवसभर चाललेल्या चर्चेच्या गुºहाळातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एकताविरुद्ध एकताविरुद्ध उद्योग विकास अशा तीन पॅनलमध्ये आता सरळसरळ लढत होणार आहे. माघारीनंतर ३३ जागांसाठी ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  निमा या औद्योगिक संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनल तयार झाले आहे, तर सत्ताधारी एकता पॅनलच्या श्रेष्ठींमध्ये गेल्या आठ दिवसांपासून चर्चेचे गुºहाळ सुरू होते. नाराज बंडखोरांकडून तिसऱ्या पॅनलची निर्मिती होण्याची शक्यता गृहीत धरून उमेदवारी जाहीर केली जात नव्हती. शेवटी उमेदवारी माघारीच्या दिवशी जे व्हायचे ते झालेच. उमेदवारी देण्यावरून सत्ताधारी एकता पॅनलमध्येच एकमत न झाल्याने एकता दुभंगली आणि एकता पॅनलमध्ये दोन गट तयार झाले आहेत, तरीही रविवारी माघारीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून समेटासाठी एक दिवसाची मुदत घेण्यात आली
होती. त्यानंतर सोमवारी दिवसभर मॅरेथॉन बैठका घेऊनही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता एकता विरुद्ध एकता आणि उद्योग विकास असे तीन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहेत.  एकता पॅनल (मंगेश पाटणकर गट)चे अध्यक्ष पदाचे उमेदवार माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष लघुउद्योग उदय खरोटे, सरचिटणीस समीर पटवा, चिटणीस व्हीनस वाणी, खजिनदार गजकुमार गांधी, तर एकता पॅनल (धनंजय बेळे गट)चे अध्यक्ष पदाचे उमेदवार के. एल. राठी, उपाध्यक्ष लघुउद्योग आशिष  नहार, सरचिटणीस आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, चिटणीस मिलिंद राजपूत, खजिनदार आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, तर  उद्योग विकास पॅनलकडे अध्यक्षपदाचा उमेदवार नाही, तर उपाध्यक्ष लघुउद्योग शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, चिटणीस सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास अहेर असे पदाधिकाºयांचे उमेदवार आहेत.
खरे पॅनल कोणते?
सत्ताधारी एकता पॅनलचे लघुउद्योग गटासाठीचे उमेदवार उदय खरोटे आणि आशिष नहार यांच्या नावात एकमत होत नसल्याने फूट पडल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी समेटासाठी भाजपाचे नेते सुनील बागुल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. बागुल यांनी दिवसभर मॅरेथॉन बैठका घेऊनही एकमत होऊ शकले नाही.  कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने अखेर बागुल यांनाच माघार घ्यावी लागल्याचे सांगितले जात आहे. एकता पॅनलमध्ये दोन गट पडले असून, दोघेही गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांनी एकता नावावर दावा केल्याने नेमके खरे एकता पॅनल कोणते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Split into solidarity panel; Discuss incompatible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.