'राम बंधू' आयोजित 'गोष्ट एका पैठणीची'च्या शोला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 12:03 PM2022-12-11T12:03:25+5:302022-12-11T12:04:16+5:30
चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी 'गोष्ट एका पैठणीची' टिम आणि 'संस्कृती पैठणी' यांच्या वतीने लकी ड्रॉ काढून भाग्यवान विजेत्यास 'संस्कृती पैठणी' भेट देण्यात आली..
महाराष्ट्रभर सध्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून इंद्रायणीचा हा स्वप्नवत प्रवास सगळ्यांना भावतोय.. नाशिकमध्ये 'राम बंधू' आयोजित या चित्रपटाच्या विशेष शोलासुद्धा नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.. या शो साठी नाशिकचे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची खास उपस्थिती होती.. तसेच 'राम बंधू'चे व्यवस्थापकीय संचालक उमेश राठी, अध्यक्ष हेमंत राठी, चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली संजीव, दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्यासोबत अभिनेता पुष्कर श्रोत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी 'गोष्ट एका पैठणीची' टिम आणि 'संस्कृती पैठणी' यांच्या वतीने लकी ड्रॉ काढून भाग्यवान विजेत्यास 'संस्कृती पैठणी' भेट देण्यात आली..
यावेळी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, मराठी सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने वर येतोय.
या सिनेमामध्ये महाराष्ट्राची संस्कृती म्हणून आपण ज्याकडे पाहतो अशा 'पैठणी'ला खूप सुंदर पद्धतीने सादर केलंय. ही गोष्ट आपलीशी वाटली..
'राम बंधू'चे व्यवस्थापकीय संचालक उमेश राठी म्हणतात,' खूप छान कथा,उत्तम अभिनय,उत्तम दिग्दर्शन सगळ्याच बाबतीत चित्रपट उजवा आहे..यातून जो सकारात्मक संदेश दिला आहे तो सगळ्यांच्या आयुष्यात कामी येणारा आहे. सर्वांनी सिनेमा नक्की पाहावा.. एक उत्तम मराठी चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी या खास शोचं आयोजन केल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं..
मंत्रा व्हिजन प्रस्तुत, गोल्डन रेशो फिल्म्स, प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन निर्मित 'गोष्ट एका पैठणीची'चे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात भरजरी पदार्पण केलं असून प्रेक्षकांना या चित्रपटाची भुरळ पडलीये..