लॉकडाउनमध्ये रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 09:45 PM2020-05-03T21:45:41+5:302020-05-03T21:50:44+5:30
नाशिक : शहरातील सर्व महिलांसाठी लोकमत सखी मंचतर्फे लॉकडाउनच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेसह शहर व जिल्हाभरातील सर्व कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सूर चैतन्याचा या गायन स्पर्धेला नाशिकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिलांनी कोरोना विषाणूविषयी जनजागृती करणाऱ्या विषयांवर रांगोळी काढून स्पर्धेत चुरस निर्माण केली, तर जिल्हाभरातून अनेक कटुंबीयांनी त्यांच्या कुटुंबातील गाणे, कविता, भजन व प्रार्थनांचे व्हिडिओ पाठवून या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
’लोकमत न्यूज नेटवर्क

लोकमत सखी मंचतर्फे लॉकडाउनच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृती अणि मांगल्याची उपासना असलेली रांगोळी अनेक महिला समाजाच्या जनजागृतीसाठी काढतात. अशाचप्रकारे लोकमत सखी मंचच्या आॅनलाइन रांगोळी स्पर्धेत शहरातील महिलांनी २४ ते २६ एप्रिल दरम्यान कोरोना विषाणूविषयी जनजागृती करणाºया रांगोळी काढून त्यांचे फोटो पाठवित रांगोळी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसह ५ उत्तेजनार्थ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे, तर २८ ते ३० एप्रिलदरम्यान ‘सूर चैतन्याचा’ या स्पर्धेत जिल्हाभरातील कुटुंबांनी सहभाग नोंदवत आपल्या कुु टुंबीयांसोबत गाणे, कविता, भजन व प्रार्थना यांचे व्हिडीओ सादरीकरण करून त्यांचे एक मिनिटाच्या ध्वनिचित्रफित पाठवून या स्पर्धेतील चुरस वाढविली.
स्पर्धेतील चार विजेत्यांसह ११ स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी तेजस्वी ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले.रांगोळी स्पर्धेचे विजेते
प्रथम- रोहिनी सोनार
द्वीतीय- कविता गुजराथी
तृतीय- राजश्री रणधीर
उत्तेजनार्थ- हर्षदा विसपुते, मनीषा बोडके, सपना बोथरा, जयश्री सोनवणे, प्रतीक्षा पाटीलसूर चैतन्याचा स्पर्धेचे विजेतेप्रथम- वृंदा राव व परिवार द्वितीय- श्रद्धा शुक्ला व परिवार
तृतीय- राजेश्वरी नागर व परिवार चतुर्थ- गोरक्षनाथ कासार व परिवार
उत्तेजनार्थ- सुनीता गाफने, भूमिका तोष्णीवाल, तिलोत्तमा जोशी, इशा व अनगा चोखर, श्वेता चांडक, प्रणाली बोरसे, उज्ज्वला गरुड, मोहिनी अमृतकर, विना वैद्य, सुनीता बोरा, संगीता राऊत.