रन फॉर युनिटी ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 05:07 PM2018-10-31T17:07:07+5:302018-10-31T17:07:30+5:30

सायखेडा : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायखेडा पोलीस स्टेशन व येथील जनता इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.

 Spontaneous response to the Run for Unity | रन फॉर युनिटी ला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित रन फॉर युनिटी या उपक्र मात धावतांना सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, समवेत विद्यार्थी, पोलीस कर्मचारी. 

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षिका ए. पी. लांडगे व सायखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता दौड मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रशस्तीपत्र देखील देण्यात आले.


सायखेडा : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायखेडा पोलीस स्टेशन व येथील जनता इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. एकूण ५ किमी अंतर याठिकाणी सायखेडा कॉलेज, सायखेडा चौफुली ते चाटोरी यादरम्यान धावण्यात आले. याठिकाणी शिक्षिका ए. पी. लांडगे व सायखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता दौड मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रशस्तीपत्र देखील देण्यात आले. यावेळी सायखेडा येथील नागरिक घनश्याम जोंधळे, जनता इंग्लिश स्कुल चे शिक्षक रमेश अडसरे, अवधूत आवारे तसेच पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. डी. सोनवणे, कर्मचारी किरण ढेकले, हेमंत गरु ड, नवनाथ नाईकवाडे, मदन कहांडळ, सुनील धोंडगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. के. सातभाई यांनी केले व आभार गणेश पाटील यांनी मानले.
 

Web Title:  Spontaneous response to the Run for Unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.