७५ कोटी सूर्यनमस्कार महायज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 11:12 PM2022-02-07T23:12:02+5:302022-02-07T23:13:08+5:30
मालेगाव : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यानिमित्त क्रीडा भारती, आयुष मंत्रालय, पतंजली योग विद्यापीठ, गीता परिवार, नॅशनल योगा स्पोर्ट्स फेडरेशन हार्ट फुलनेस अशा ६ अखिल भारतीय सामाजिक व क्रीडा संघटना यांच्यामार्फत संपूर्ण भारतात ७५ कोटी सूर्यनमस्कार करण्याचा उपक्रम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात विविध सामाजिक व क्रीडा संघटनांनी एकत्रित येत सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले होते.

तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये योगा व सूर्यनमस्काराची आवड निर्माण व्हावी, तसेच पारंपरिक शास्त्रोक्त व्यायाम प्रकार व सूर्यनमस्काराचा प्रसार व्हावा, यासाठी साठ फुटी रस्त्यावरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल येथे सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले जाते. प्रारंभी गानसरस्वती लतादीदी मंगेशकर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शक्तीचे दैवत श्री बजरंग बली यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तुकाराम मांडवडे यांनी ह्यखेल खिलाडी खेलह्ण हे सामूहिक गीत सादर केले. क्रीडा भारतीचे जिल्हामंत्री गीतेश बाविस्कर यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. शहर संयोजक भाग्येश कासार यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सहभागी संघटनांच्या प्रमुख व प्रतिनिधींना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मालेगाव शहराध्यक्ष चेतन वाघ यांनी आभार मानले.
क्रीडा प्रकार आत्मसात करा : पोफळे
अभिजीत जाधव व स्वाती मराठे यांनी आलेल्या विद्यार्थी व खेळाडूंकडून सामूहिक सूर्यनमस्कार करून घेतले. आरोग्य व मनस्वास्थ्य ठेवण्यासाठी क्रीडांगणावर जास्तीतजास्त वेळ देऊन विविध पारंपरिक क्रीडा प्रकार आत्मसात करून, नवीन पिढी घडविण्यात योगदान दिले पाहिजे, असे आवाहन क्रीडा भारतीचे प्रांत उपाध्यक्ष नितीन पोफळे यांनी केले. क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष भानू कुलकर्णी यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व विशद केले.