‘सूर निरागस हो...’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:38 AM2019-10-31T00:38:13+5:302019-10-31T00:38:32+5:30
चेतनानगर येथे बाजीराव फाउंडेशनच्या वतीने पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वरस्पंदन प्रस्तुत मैफलीत गायक कांचन गोसावी, संदीप थाटसिंगार, चेतन थाटसिंगार यांनी विविध गीते सादर केली.
इंदिरानगर : चेतनानगर येथे बाजीराव फाउंडेशनच्या वतीने पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वरस्पंदन प्रस्तुत मैफलीत गायक कांचन गोसावी, संदीप थाटसिंगार, चेतन थाटसिंगार यांनी विविध गीते सादर केली.
चेतनानगर येथे आयोजित या कार्यक्रमात स्वरस्पंदनच्या कलाकारांनी सूर निरागस हो, उठी श्रीरामा, विठ्ठल आवडी, कानडा राजा पंढरीचा, अधीर मन झाले, वृंदावनी सारंग, चिंब पावसानं, पाहिले ना मी तुला आदी गीते सादर केली. गायक कांचन गोसावी, संदीप थाटसिंगार, चेतन थाटसिंगार यांनी सादर केलेल्या गीतांना रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यांना वादक कन्हैया खैरनार, सुनील साळवे, कैलास गुरव, मनोज गायकवाड, शशी निकम, बंटी देवरे यांनी साथसंगत केली. यावेळी निवेदन अमर भोळे यांनी केले. कार्यक्र माचे आयोजन नगरसेवक पुष्पा आव्हाड यांनी केले होते. याप्रसंगी बाजीराव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव आव्हाड, आयोजक नगरसेविका पुष्पाताई आव्हाड व कन्हैया खैरनार आदींसह नागरिक उपस्थित होते.