विविध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: September 14, 2016 10:28 PM2016-09-14T22:28:32+5:302016-09-14T22:33:20+5:30
येवला फेस्टिव्हल : जादूच्या प्रयोगांसह बोलक्या बाहुल्यांचा खेळ
येवला : शहरातील न्यू डिस्को फ्रेण्ड सर्कल यांच्या वतीने गणेशोत्सवात येवला फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध सांस्कृतिक, धार्मिक, कला, समाज-प्रबोधनपर स्पर्धांचा समावेश होता. यावेळी उत्कृष्ट मोदक सजावट, मेहंदी, श्री गणेशाचे चित्रभरण, बालगणपती सजावट अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या जादूचे प्रयोग व बोलका बाहुला या खेळास येवलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उत्कृष्ट मोदक सजावट स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमध्ये प्रथम बेबी न्याती, द्वितीय सोनल कायस्थ, तृतीय सायली खंदारे, उत्तेजनार्थ मीराबाई चौधरी, अनामिक कायस्थ तसेच मेहंदी स्पर्धेत प्रथम पूजा काबरा, द्वितीय शिवानी मिस्कीन, तृतीय दीपश्री पावटेकर, तर उत्तेजनार्थ रूपल मारशा, साक्षी घोडके या मानकरी ठरल्या. चित्रभरण स्पर्धेमध्ये लहान गटात प्रथम रु द्राक्ष वाघ, द्वितीय अथर्व पहिलवान, तृतीय प्रतीक्षा कोकणे, तर उत्तेजनार्थ नक्षत्रा दोडे, ओम शितोळे, अदिती पवार, अफसाना शहा त्याचप्रमाणे मोठ्या गटात प्रथम जान्हवी पवार, द्वितीय समृद्धी सांबर, तृतीय ब्रिजेश क्षत्रिय, तर उत्तेजनार्थ संतोष डांगरे, ममता कुक्कर, सक्षम बाकळे, श्रुती झोंड यांनी पारितोषिके मिळवली. विजेत्यांना नावीन्य पैठणी व मंडळाच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. परीक्षक म्हणून प्रभाकर झळके, शंकरलाल टाक, भारती खैरे, मिताली टाक, मंगेश रहाणे, संतोष खंदारे यांनी काम पाहिले.
प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय नागडेकर यांनी केले. संतोष जेजूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी न्यू डिस्को फ्रेण्ड सर्कलचे रामा तुपसाखरे, मुकेश लचके, धनंजय लचके, गणेश खैरे, मुकुंद टिभे, रत्नाकर खैरे, प्रवीण गांगुर्डे, प्रकाश लग्गड, नईम शेख, राकेश खैरे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)