पाण्यासाठी लासलगावकरांचा उत्स्फूर्त बंद; २०-२२ दिवसांपासून पाण्यासाठी लोक त्रस्त

By धनंजय वाखारे | Published: May 11, 2024 12:31 PM2024-05-11T12:31:07+5:302024-05-11T12:31:17+5:30

नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले

Spontaneous shutdown of Lasalgaon for water; People are suffering for water for 20-22 days | पाण्यासाठी लासलगावकरांचा उत्स्फूर्त बंद; २०-२२ दिवसांपासून पाण्यासाठी लोक त्रस्त

पाण्यासाठी लासलगावकरांचा उत्स्फूर्त बंद; २०-२२ दिवसांपासून पाण्यासाठी लोक त्रस्त

शेखर देसाई

लासलगाव (नाशिक) :  लासलगाव सह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनमध्ये वारंवार होणारी गळती आणि कोरडे पडलेले नांदूर मध्यमेशवर धरण अशा अनेक समस्येमुळे गेल्या 20 ते 22 दिवसांपासून लासलगावकर पाण्यापासून वंचित होते. याच्या निषेधार्थ आज लासलगावकरांनी बंद पाळत  प्रशासनाचा निषेध केला.

पाईपलाईन लिकेज, मोटार नादुरुस्ती होणे, वीज पुरवठा खंडित व धरणाने गाठलेला तळ या विविध समस्यामुळे लासलगावकरांना अनेक दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. लहान मुले, महिला व पुरुष वर्ग आपले काम धंदे सोडून  हंडाभर पाण्यासाठी वणवण करताना दिसत होते. लासलगाव व परिसरातील नेतेमंडळी  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मग्न असून  सर्व सामान्य नागरिक मात्र  पाणी प्रश्नसाठी लढतांना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी बैठक घेतली यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली मात्र या दोन्ही बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने समस्त लासलगावकरांनी बंदची हाक देत आपला रोष व्यक्त केला.

अखेर पाणी सोडले

दरम्यान या बंद मुळे प्रशासन खडबडून जागे होत तात्काळ उपयोजना करून वालदेवी मुकणे व दारणातून पाणी सोडून ते लासलगाव ला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर धरणात टाकले जाणार आहे.

Web Title: Spontaneous shutdown of Lasalgaon for water; People are suffering for water for 20-22 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.