देवपूर विद्यालयात क्रीडा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:00 PM2020-01-11T23:00:37+5:302020-01-12T01:19:32+5:30
खेळात जय-पराजय होतच असतात. मात्र पराभवाचे शल्य न मनात न ठेवता सर्वांनी खिलाडू वृत्तीने व सांघिकपणे खेळ केल्यास आपल्या संघाचे व शाळेचे नाव उज्ज्वल होत असते, असे प्रतिपादन सिन्नर पंचायत समितीचे गटनेते तथा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संचालक विजय गडाख यांनी केले.
सिन्नर : खेळात जय-पराजय होतच असतात. मात्र पराभवाचे शल्य न मनात न ठेवता सर्वांनी खिलाडू वृत्तीने व सांघिकपणे खेळ केल्यास आपल्या संघाचे व शाळेचे नाव उज्ज्वल होत असते, असे प्रतिपादन सिन्नर पंचायत समितीचे गटनेते तथा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संचालक विजय गडाख यांनी केले.
तालुक्यातील माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटनप्रसंगी ध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक आर. वाय. मोगल, सुमन मुंगसे, श्रीहरी सैंद्रे, सुनील पगार, दत्तात्रय आदिक आदी उपस्थित होते. यावेळी गडाख म्हणाले क्रीडा स्पर्धामधून विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण वाढीस लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक क्रीडा प्रकारात सहभागी व्हावे. शारीरिक तंदुरुस्तीसाठीही मैदानी खेळ गरजेचे असल्याचे गडाख यांनी सांगितले.
यावेळी कबड्डी व खो खो स्पर्धा घेण्यात आल्या. चुरशीच्या व उत्कंठावर्धक लढती पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
स्पर्धा यशस्वितेसाठी क्रीडाशिक्षक शंकर गुरुळे, वैशाली पाटील, प्रमोद बधान, नानासाहेब खुळे, राजेश आहेर, सुवर्णा मोगल, मीनानाथ जाधव, ताराबाई व्यवहारे, गणेश मालपाणी, रवि गडाख, सोपान गडाख, विलास पाटील, बाबासाहेब गुरुळे, नारायण भालेराव, सतीश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.