न्यू इंग्लिश स्कूल पालखेड येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 07:12 PM2019-12-24T19:12:41+5:302019-12-24T19:13:37+5:30
निफाड : महाराष्ट्र शिक्षण संस्था अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल पालखेड येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. क्र ीडा स्पर्धेचे ...
निफाड : महाराष्ट्र शिक्षण संस्था अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल पालखेड येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. क्र ीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव दत्तात्रय जोंधळे, संचालक दीपक जोंधळे, स्कूल कमिटी अध्यक्ष निवत्ती थेटे, उपाध्यक्ष सुरेश आहेर, पंडित आहेर, पालखेडचे सरपंच रवींद्र कोकाटे, बाळासाहेब थेटे, भाऊसाहेब थेटे, रामभाऊ आहेर, माधव खैरे, सतीश थेटे, आर. के. थेटे, अशोक शिंदे, धनंजय महाले, डी. जे. जाधव, मंगेश छाजेड, भाऊसाहेब शिंदे, बेबी आगवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धेत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील संस्थेच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन अशोक शेळके, जाधव यांनी, प्रास्तविक देशमुख यांनी तर आभार डी. एम. थेटे यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
खो खो-मुली-१७ वर्षे वयोगटात प्रथम - छत्रपती शिवाजी हायस्कूल, उगाव, द्वितीय - डी. एम. हायस्कूल, मºहळ. खो खो मुले १९ वर्षे वयोगटात प्रथम - न्यू इंग्लिश स्कूल, पालखेड, द्वितीय - न्यू इंग्लिश स्कूल, तळेगाव दिघे. खो-खो-मुल े- १७ वर्षे वयोगटात
प्रथम - न्यू इंग्लिश स्कूल, पालखेड, द्वितीय - पंडित नेहरू विद्यालय, निमगाव जाळी.