छत्रे विद्यालयात क्रीडा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:39 PM2019-12-23T23:39:00+5:302019-12-23T23:40:11+5:30
मनमाड : येथील छत्रे विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव शहरातील महर्षी वाल्मिकी स्टेडिअम येथे संपन्न झाला.
मनमाड : येथील छत्रे विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव शहरातील महर्षी वाल्मिकी स्टेडिअम येथे संपन्न झाला.
दोन दिवस सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिनेश धारवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक के. एस. लांबोळे, उपमुख्याध्यापक आर. एन. थोरात, प्रवीण व्यवहारे आदी उपस्थित होते.
विजयी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पोरितोषिक वितरण करण्यात आले.
विद्यालयातील विद्यार्थी -विद्याथिनींनी विविध क्रीडाप्रकारांत सहभागी होत खेळाचा आनंद लुटला. लहान गट मध्यम गट व मोठा गटात स्पर्धा घेण्यात आल्या. संगीतखुर्ची, सॅक रेस, बादलीत चेंडू टाकणे, स्लो सायकल स्पर्धा, दोरीवरील उड्या, शंभर मीटर धावणे या विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी सहभागी होत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कृतीची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडाप्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, हरीश चंद्रात्रे, संस्थेचे अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, पर्यवेक्षक संदीप देशपांडे आदींसह क्रीडा समिती व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.