जैन विद्यालयात क्रीडामहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:55 PM2020-01-30T22:55:56+5:302020-01-31T00:52:02+5:30
श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता आर. बाफना यांनी दिली. यावर्षीही क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
चांदवड : श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता आर. बाफना यांनी दिली. यावर्षीही क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मानद सचिव जवाहरलाल आबड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जलतरणपटू कश्यप बेनी, टेनिसपटू शेखर भंडारी, प्रबंध समितीचे सदस्य समन्वयक शांतीलाल अलिझाड, झुंबरलाल भंडारी, सुमतीलाल सुराणा, नंदकुमार ब्रेचा, दिनेशभाऊ लोढा, नगर परिषदेच्या नगराध्यक्ष श्रीमती रेखाताई गवळी उपस्थित होते. क्रीडा उत्सव प्रमुख दत्ता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी कबड्डी, खो खो, क्रिकेट, लिंबू-चमचा, लंगडी, स्लो सायकलिंग अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. एस.एन. देशमुख, युवराज ठोंबरे, एम. वाय. देवरे, कुमारी श्रद्धा माळवतकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी सूत्रसंचालन आर. एस. पाटील व एस.डी. शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांसमोर एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर केले. युवराज ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार करून घेतले. यावेळेस सांस्कृतिक प्रमुख आर. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यात गायन, नृत्य, नाटक, वाद्य वादक, विविध प्रकारच्या वेशभूषा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कॅरम, काव्य वाचन, पोस्टर व ग्रिटिंग असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
प्राचार्य डॉ. संगीता बाफना, उपप्राचार्य संदीप समदडिया, पर्यवेक्षक मीना सोनी, विभागप्रमुख सी. डी. निकुंभ, आर.एम. पवार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
कवायत, डंबेल्स, लेझीम याचेही प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. विविध प्रकारचे सामूहिक देशभक्तिपर गीते सादर करण्यात आली. कराटेचे विविध प्रकारचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना सादर करून दाखविले.