नित्यानंद शाळेत क्रीडामहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:54 PM2020-01-09T23:54:40+5:302020-01-09T23:55:01+5:30
घोटी येथील नित्यानंद इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात झाला.
घोटी : येथील नित्यानंद इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात झाला. महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे चेअरमन नंदकुमार शिंगवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापक किशोर बुंदेले व मुख्याध्यापक इंदिरा प्रसाद यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून क्रीडामहोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
लहान गटातील चिमुकल्यांनी तारे जमीन पर या गीताने तसेच दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अॅरोबिक ड्रिल डान्स, तिसरीच्या विद्यार्थ्यांनी काठी
ड्रिल अशा विविधरंगी नृत्यप्रकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबरोबर १०० मीटर रनिंग, नॉव्हेल्टी रेस, रिले, लेजीम नृत्य, विविध प्रकारच्या आकृत्या करून यामधील स्टार, स्वस्तिक, कमळफूल, २०२० नववर्षाच्या स्वागतपर आकर्षक कलाकृतीने सर्वांची मने जिंकली तसेच टाळ्यादेखील मिळविल्या. याप्रसंगी मैदानी खेळांबरोबरच कराटेमधील वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.
क्रीडामहोत्सवात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान सोहळा झाला. कॅरम, बुद्धिबळ, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, कबड्डी, व्हॉलीबॉल क्रिकेट, डॉज बॉल, रनिंग अशा विविध प्रकारांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे संस्थापक प.पू. चेतन महाराज, शाळेचे चेअरमन नंदकुमार शिंगवी, व्यवस्थापक किशोर बुंदेले, मुख्याध्यापक इंदिरा प्रसाद, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.