महाबळ चाैकाच्या नामांतरास क्रीडा प्रेमींचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:18 AM2021-01-19T04:18:23+5:302021-01-19T04:18:23+5:30
नाशिक- महात्मा गांधी रोडवरील टिळक पथ सिग्नलच्या चौकाला देण्यात आलेले व्यायामाचार्य कृ. बा. महाबळ चौकाचे नामांतर करण्यास क्रीडा प्रेमी ...
नाशिक- महात्मा गांधी रोडवरील टिळक पथ सिग्नलच्या चौकाला देण्यात आलेले व्यायामाचार्य कृ. बा. महाबळ चौकाचे नामांतर करण्यास क्रीडा प्रेमी आणि क्रीडा संस्था प्रतिनिधींनी विरोध केला असून, हे नाव बदलू नये, यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांना सोमवारी (दि.१८) निवेदन देण्यात आले. महापालिकेची महासभा मंगळवारी (दि.१९) हेाणार असून, या सभेत हा प्रस्ताव एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने मांडला आहे. स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची पार्श्वभूमी असलेल्या व्यायामाचार्य कृ. बा. महाबळ गुरुजी यांचे नाव १९८२ मध्ये या चौकास देण्यात आले. महापालिकेच्या दरबारी तशी नोंददेखील आहे; मात्र आता कोणतेही कारण नसताना अचानक या चौकाचे नामकरण करण्याचे घाटत आहे. त्यास विरोध करण्यासाठी श्री यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, अविनाश पाटील, डॉ. जयराम महाबळ, प्रशांत गायकवाड, आनंद खरे, रघुनाथ महाबळ आणि विजय खरोटे यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना निवेदन दिले.
महाबळ गुरूजींनी दिलेल्या योगदानामुळे आज अनेक पिढ्या या व्यायामशाळेत घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या योगदानाची दखल घेऊन केलेल्या या नामकरणाच्या ठरावास रद्द करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे; मात्र महापालिकेने असे केाणतेही पत्र शासनाकडे पाठवलेले नाही; मात्र तरीही आता महासभेत चौकाचे नामांतर करण्याचा प्रस्ताव असून, महाबळ गुरुजींच्या चौकाशिवाय अन्य कोणाचे नाव देऊ नये, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
-----
छायाचित्र १८ महाबळ नावाने सेव्ह...
छायाचित्र श्री यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, अविनाश पाटील, डॉ. जयराम महाबळ, प्रशांत गायकवाड, आनंद खरे, रघुनाथ महाबळ आणि विजय खरोटे यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना निवेदन दिले.