सटाण्यात साकारणार क्रीडा संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:13 PM2020-02-17T23:13:38+5:302020-02-18T00:19:25+5:30
सटाणा पालिकेकडून लवकरच शहरात अद्ययावत क्रीडा संकुल साकार होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शाळा, महाविद्यालयांच्या क्रीडाशिक्षकांची बैठक घेऊन संभाव्य क्रीडा संकुलाच्या आराखड्याबाबत विचारविनिमय केला.
सटाणा : येथील पालिकेकडून लवकरच शहरात अद्ययावत क्रीडा संकुल साकार होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शाळा, महाविद्यालयांच्या क्रीडाशिक्षकांची बैठक घेऊन संभाव्य क्रीडा संकुलाच्या आराखड्याबाबत विचारविनिमय केला. यावेळी क्रीडाशिक्षकांनी सूचना केल्या. त्यासाठी शहराच्या हद्दीतच अडीच एकर जागा क्र ीडांगणासाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे.
याबाबतची प्रशासकीय कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या एप्रिल महिन्याअखेर जागेचा प्रश्न निकाली निघणार आहे. इनडोर व आउटडोअरसाठी स्वतंत्र सुविधा असाव्यात. स्विमिंगपूलसाठी जागेची उपलब्धता करावी, ग्रीन जिमसाठीही पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली. त्यानुसार क्रीडा संकुलाच्या आराखड्यात संबंधित गोष्टींचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिले. या बैठकीसाठी मुख्याधिकारी हेमलता डगळे, बांधकाम अभियंता चेतन विसपुते, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भोई, ज्ञानेश्वर खैरनार, नगरसेवक दीपक पाकळे, सामाजिक कार्यकर्ते दत्तू बैताडे, क्रीडाशिक्षक सी.डी. सोनवणे, एन. के. मोरे, गणेश वाघ, स्नेहा गरु ड, एन. डी. वाघ, विजय सूर्यवंशी, ए. डी. पवार आदींसह क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
शहर, तालुक्यातील खेळाडूंना स्थानिक पातळीवर मात्र पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. तंत्रशुद्ध मार्गदर्शन, प्रशिक्षण व अद्ययावत सोयी सुविधा तसेच सरावासाठीही जागा उपलब्ध नसल्याने नैपुण्य असूनही या गुणवंतांचा प्रचंड हिरमोड होतो. तालुक्यात किमान एक तरी अद्ययावत क्र ीडा संकुल असावे, अशी जुनी मागणी आहे. सटाणा नगर परिषदेने यासाठी पुढाकार घेतला असून, नगर परिषदेकडून स्वतंत्र क्र ीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.