विनाकारण फिरणाऱ्यांची ‘ऑन द स्पॉट’ कोरोना टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:51+5:302021-04-30T04:17:51+5:30
ओझर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असल्याने व्यापारी असोसिएशनकडून १७ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत जनता ...
ओझर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असल्याने व्यापारी असोसिएशनकडून १७ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यू घोषित केलेला असतानाही नागरिक विनाकारण गावात फिरत आहेत. त्याला आळा बसावा यासाठी पोलीस व नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभागामार्फत गडाख कॉर्नर येथे गुरुवारी(दि.२९) सकाळी अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्या टेस्टमध्ये २५ पैकी पाच अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांना कोविड विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले असल्याचे आरोग्य अधिकारी अनिल राठी यांनी सांगितले. ओझर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दररोज सत्तरपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत, तर बुधवारी एकाच कुटुंबातील १६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तरीदेखील शासनाने लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या निर्देशांचे ओझर गावातील असंख्य नागरिकांडून पालन केले जात नसल्याचे चित्र आहे.
इन्फो
पोलिस यंत्रणा ॲक्शनमोडवर
रात्री संचारबंदी असतानादेखील अनेक नागरिक व टवाळखोर चौकाचौकांत विनाकारण फिरत असल्याने करोनाचा संसर्ग वेगाने फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये आले आहे. नगर परिषद प्रशासनाच्या मदतीने आता पोलिसांनी दिवसा व रात्री विनाकारण फिरणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
फोटो- २९ ओझर ऑन द स्पॉट-१
===Photopath===
290421\29nsk_12_29042021_13.jpg
===Caption===
फोटो- २९ ओझर ऑन द स्पॉट-१