विवाहितेस मुलांसह आत्महत्येस प्रवृत्त केले पतीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:12 PM2019-12-31T23:12:31+5:302019-12-31T23:12:53+5:30
लासलगाव : निफाड तालुक्यातील रानवड येथील विवाहितेस मुलांसह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी सुनावली आहे. यात सासु सासरे दीरही दोषी ठरले आहेत.
लासलगाव : निफाड तालुक्यातील रानवड येथील विवाहितेस मुलांसह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी सुनावली आहे. यात सासु सासरे दीरही दोषी ठरले आहेत.
मयत सुशिला वाघ यांचे वडील लहानु गारे यांनी याबाबत पिंपळगाव (ब) पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार सुशिला सासरी रानवड येथे नांदत असतांना बोअर वेल करण्यासाठी माहेरु न पन्नास हजार रु पये आणले नाही म्हणुन तीचा शारीरिक, मानसिक छळ व मारहाण करु न तीस १५ मार्च २०१२ रोजी पहाटे दोन मुलांसह आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणुन पती रावसाहेब पंढरीनाथ वाघ, सासु विमल वाघ, सासरे पंढरीनाथ एकनाथ वाघ, दिर गणेश वाघ यांचेविरु ध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हाचा तपास तत्कालीन पोलिस निरिक्षक व्हि. डब्लू. कोहीनकर यांनी केला.
आरोपपत्र निफाडचे जिल्हा सत्र न्यायालयात सादर केले सरकार पक्षातर्फे एकुण सात साक्षीदारांची साक्ष सहायक जिल्हा सरकारी विकल अॅड रमेश कापसे यांनी नोंदविली. सदर खटल्यात न्यायाधीश वाघमारे यांनी मयत विवाहितेचे पती रावसाहेब वाघ यास दहा वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रु पये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद, तीन वर्षे कैद व तीन हजार रु पये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद. तर सासु विमल वाघ, सासरे पंढरीनाथ वाघ, दिर गणेश वाघ यांना तीन वर्षे साधी कैद व तीन हजार रु पये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्याच्या निकालाकडे रानवड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागुन होते.