कोनांबेत पुन्हा जंतूनाशक औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 06:32 PM2020-04-19T18:32:53+5:302020-04-19T18:33:24+5:30
सिन्नर : तालुक्यातील कोनांबे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग दुसऱ्यांदा तालुक्यातील कोनांबे गावात जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

सरपंच संजय देवरे, ग्रामसेवक संदीप देवरे यांच्या पुढाकारातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. गावात दोन वेळेस सोडियम हायड्रोक्लोराइडची ट्रँक्टरच्या सहाय्याने फवारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांना मास्क आणि सँनिटायझर वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच संजय डावरे, उपसरपंच रंजना भागवत, सदस्य बंडू डावरे, प्रकाश डावरे, राजू लहामगे, छाया मुंढे, यमुना भांगरे, ग्रामसेवक संदीप देवरे, ग्रामपंचायत कर्मचारी एकनाथ वाघमारे, रवींद्र मुंढे, अंगणवाडी व आशा सेविका, आरोग्य सेविका वंदना तळपे आदींकडून नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.