वाहनांवर सॅनिटायझर फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:01 PM2020-04-15T23:01:20+5:302020-04-15T23:01:47+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ओझरचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स व चारही प्रवेशद्वारावर लाकडांची बांधणी लावून सील केले आहेत. येथे येणाºया प्रत्येक वाहनावर ग्रामपालिकेच्या माध्यमातून सॅनिटायझर स्प्रे करण्यात येत आहे.
ओझर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ओझरचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स व चारही प्रवेशद्वारावर लाकडांची बांधणी लावून सील केले आहेत. येथे येणाºया प्रत्येक वाहनावर ग्रामपालिकेच्या माध्यमातून सॅनिटायझर स्प्रे करण्यात येत आहे.
सायखेडा फाट्याकडून मारुती वेशीत प्रवेश करणाºया वाहनांसह नागरिकांवरही ट्रॅक्टरला ब्रोअर लावून सॅनिटायझरचा स्प्रे ग्रामपालिका कर्मचाºयाांमार्फत दिवसभर करण्यात येत आहे. ग्रामपालिकेने अत्यावश्यक किराणा मालासाठी सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेची वेळ नेमून दिली आहे. तसेच ग्राहकांसाठी सामाजिक अंतर राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. एचएएल परिसरात ३८२हून अधिक नागरिकांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आल्याने सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क होऊन दक्षता घेत आहे.
बँकांपुढे रांगा; पैसे काढायलाही चटके
पंतप्रधान सुरक्षा जनधन योजनेचे पाचशे रुपये काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत अहेत. प्रखर उन्हात महिला आणि वृद्धांना भर उन्हात उभे चटके व घशाला कोरड पडेपर्यंत तासन्तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे.
भाजीपाला खरेदीसाठी दोन दिवस
ग्रामपालिकेने आठवड्यातील फक्त सोमवार आणि शुक्र वार भाजी विक्रेत्यांसाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ ठरवून दिली आहे. पंचवड नगर, संभाजी चौक, प्रभुधाम, साईधाम, सायखेडा रोड आदी ठिकाणे भाजीपाला विक्रीसाठी नेमून दिल्याने नागरिकांना दोन दिवस का होईना ताजा भाजीपाला मिळू लागला आहे.
पोलिसांचा कडक पहारा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरिक्षक अजय कवडे यांनी गांवात प्रवेश करणाºया व विनाकारण दुचाकी फिरवणाºया टवाळखोरांवर गाड्या जप्तीचा बडगा उगारल्याने व दंड वसुलीचा सपाटा लावल्यामुळे गावात काटेकोर लॉकडाउन पहावयास मिळत आहे.