कवडदरा परिसरात जंतूनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:28 PM2020-03-30T16:28:23+5:302020-03-30T16:29:01+5:30
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतूनाशक हायपोक्लोराइट पावडरची फवारणी करण्यात आली.
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतूनाशक हायपोक्लोराइट पावडरची फवारणी करण्यात आली. परिसरात रु ग्णालये, गृह उद्योग,सरकारी बॅँका,पतसंस्था, किराणा दुकाने, खते, बि-बियाणे दुकाने, शाळा व महाविद्यालये उद्योगधंद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग मानला जातो. तसेच गर्दीची ठिकाणेही हिच असल्याने या भागात संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही हे ओळखून या भागावर स्थानिक प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. सद्यस्थिती लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी म्हणून १ टक्के हायपोक्लोराईट या निर्जंतुकीकरण पावडरच्या साहाय्याने संपूर्ण परिसरात फवारणी करु न उपाययोजना करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती. जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच कवडदरा परिसरात रोगराई पसरु नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली. या उपाययोजनेमुळे ग्रामस्थात समाधान व्यक्त केले जात आहे.