फवारणी सुरू आहे, घराबाहेर पडू नका; आयुक्तांच्या नावाने बनावट मॅसेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:50 PM2020-03-20T14:50:15+5:302020-03-20T14:55:04+5:30
नाशिक- सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्याासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून नाशिक महापालिकेच्या वतीने रात्री दहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत आपले घर उघडू नको, कोवीड १९ किल मारण्यासाठी हवेत फवारणी करण्यात येणार असल्याचा एक मॅसेज महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या नावान व्हायरल झाला आहे. मात्र, आयुक्तांनी त्याचा इन्कार केला आहे.

कोरोनामुळे नागरीकांत चिंंतेचे वातावरण आहे. शासकिय यंत्रणा विशेषत: आरोग्य यंत्रणा आपल्या स्तरावर उपाययोजना करीत असल्या तरी नागरीकांत भीती कमी होत नाही. त्यातच आता महापालिकेच्या वतीने उपाययोजना सुरू झाल्या आहेत. नागरीकांनी एकत्र येऊ नये यासाठी मंदिरांपासून जॉगींग ट्रॅक, ग्रीन जीम असे सर्वच बंद करण्यात आले आहे. त्यानंतर आता सोशल मिडीयावर मॅसेज व्हायरल हात आहे. मनपा आयुक्तांचा संदेश.... नमस्कार मी तुम्हाला विनंती करतो की, आज रात्री दहा वाजेच्या नंतर उद्या सकाळी पाच वाजपर्यंत आपले घर सोडू नका. कोविड-१९ किल मारण्यासाठी औषधांची हवेत फवारणी होणार असल्याने! आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि आपल्या कुटूंबाला ही माहिती सामाईक करा असे नमूद करण्यात आले आहे.
सोशल मिडीयावर यासंदर्भात झपाट्याने हा मॅसेज प्रसारीत होत असून त्यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मात्र त्याचा इन्फार केला असून ही अफवा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.