लिकेत व्यक्तीवर मशीनद्वारे फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 09:54 PM2020-04-05T21:54:47+5:302020-04-05T21:55:56+5:30
मनमाड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या प्रवेशद्वारात औषध फवारणी मशीन बसविण्यात आले असून, पालिकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर फवारणी करून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातल्याने वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता निर्माण झाली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. पालिकेचे सर्व कर्मचारी व अधिकारी शहराच्या विविध भागात फिरून प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. पालिकेत येणाºया या कर्मचाऱ्यांचे तसेच शहरातील व्यक्तीचे सॅनिटायझेशन करण्यासाठी पालिकेच्या प्रवेशद्वारातच औषध फवारणी मशीन बसविण्यात आले आहे. पालिकेत येणाºया व जाणाºया प्रत्येक व्यक्तीवर या मशीनमधून औषध फवारणी करण्यात येत आहे. शहरातील कचरा गोळा करणाºया घंटागाड्या, कचºयाचे ट्रॅक्टर यासह अन्य वाहनांवर पालिकेकडून दररोज सॅनिटायझरद्वारे फवारणी केली जात आहे. नागरिकांनीही सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.