रुग्णसंख्या वाढल्याने मलढोणला फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:14 AM2021-04-21T04:14:28+5:302021-04-21T04:14:28+5:30
---------------------------------------------- रेमडेसिविर राखीव ठेवण्याची मागणी सिन्नर: केमिस्ट बांधवांसाठी रेमडेसिविर इंजेशक्शन राखीव ठेवण्याची मागणी सिन्नर तालुका केमिस्ट सोशल ग्रुपच्यावतीने तहसीलदार ...
----------------------------------------------
रेमडेसिविर राखीव ठेवण्याची मागणी
सिन्नर: केमिस्ट बांधवांसाठी रेमडेसिविर इंजेशक्शन राखीव ठेवण्याची मागणी सिन्नर तालुका केमिस्ट सोशल ग्रुपच्यावतीने तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कॅडिला हेल्थकेअरचे रेमडॅक इंजेक्शन ८९९ रुपयांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्री करण्याची तयारी ग्रुपने व्यक्त केली. निवेदनावर ग्रुपचे अध्यक्ष शैलेश पाटील, अतुल झळके, सचिन वाळुंज, अनिल वाजे, राजेंद्र हांडोरे, अभिषेक खर्डे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------------------------------
रस्ता दुरुस्तीची मागणी
सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील वावी-दुशिंगपूर-सायाळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ हा रस्ता नव्याने बनविण्यात आला होता. मात्र समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेल्या अवजड वाहनांनी या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
---------------------------------
मदतीचा ओघ मंदावला
सिन्नर: गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदतीसाठी झटणारे हात यावर्षी मात्र अत्यल्प प्रमाणात दिसून येत आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन पडल्यानंतर अनेक सामाजिक संघटना, कंपन्या, मंडळे यांच्यासह विविध संस्था गरजू लोकांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू वाटताना दिसून आले. यावर्षी मात्र या सर्वांनी गरजूंच्या मदतीला हात आखडता घेतल्याचे चित्र आहे.