जंतूनाशक औषधांची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 04:10 PM2020-04-18T16:10:00+5:302020-04-18T16:10:35+5:30
नांदूरवैद्य : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृतीसोबतच शहरांसह ग्रामीण भागात देखील जंतूनाशक फवारणी करण्यात येत असून याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकिय आश्रमशाळा आदींसह संपूर्ण गावासह शेतीवस्तीवर सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी करत सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांच्या वतीने जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे.

इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी हा उपक्र म राबवण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी सांगितले. काननवाडी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक स्वच्छतागृहे आदी ठिकाणी जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकिय आश्रमशाळा आदीं परिसर स्वत: सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी करत फवारणी यंञ हातात घेऊन फवारणी केली. दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढण्याच्या घटना कानावर पडत असतांना ही खबरदारी म्हणून संपूर्ण गावासह शेतीवस्तीवर औषधाची फवारणी करण्यात येत असल्याचे वारघडे यांनी यावेळी माहिती देतांना सांगितले. ग्रामस्थांनी देखील या परिस्थितीत बाहेर पडू नये, आपले हात वारंवार स्वच्छ धुवावे, तसेच बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीची ग्रामपंचायत कार्यालयास माहिती देणे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोरोनापासून वाचिवण्यासाठी शासनस्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू असून आपणही शासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणे हे आपल्या आरोग्यास हानिकारक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी यावेळी कळकळीचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.