मुंबई बाजार समितीत विक्र ी झालेल्या कांदयास अनूदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:25 PM2018-12-27T18:25:02+5:302018-12-27T18:25:42+5:30
कंधाणे : ता बागलाण कांदा उत्पादक शेतकºयांना क्विंटल मागे २०० रूपये अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला असुन हयात मुंबई बाजार समितीत विक्र ी झालेल्या कांद्यास शासनाने अनुदानापासुन वगळण्यात आले असुन व शासनाने तारखांच्या लक्ष्मण रेषा घातल्याने बरेच शेतकरी हया अनुदानापासुन वंचित राहणार असुन शासनाने मागील अनुदान व कर्जमाफी सारख्या अटीशर्तींच्या लक्ष्मण रेषा न टाकता तसेच मुंबईसह सर्व बाजार समितीत विक्र ी झालेल्या सर्व कांदा विक्रेत्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी बाजार समिती संचालक संजय बिरारी हयांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार माहिले हयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बागलाण तालूक्यातील बहुतांशी शेतकरी गोणीत कांदा भरून मुंबई बाजार समितीत विक्र ी करत असतात. ज्यावेळी स्थानिक बाजार पेठेत बाजारभावाची अनिश्चितता असते त्यावेळी मुंबई बाजार समितीत मोठया प्रमाणात कांदा विक्र ी होत असतो हयावर्षी स्थानिक बाजार पेठेत कांदा बाजार भावाची स्थिती दिवसेदिवस दोलायमान होत असल्याने तालूक्यातील बळीराजाकडून मोठया प्रमाणात मुंबई बाजार समितित कांदा विक्र ी केला आहे पण शासनाच्या नविन अध्यादेश नुसार मुंबई बाजार समितीत विक्र ी झालेल्या कांदया विक्र ीस अनूदानापासुन वगळण्यात आले आहे.
बागलाण तालूका दुष्काळाच्या गडद छायेत असुन खरीप हाताचा गेला भाजीपाला मातीमोल विकला गेला सर्व आर्थिक मदार ज्या कांदा पिकावर होती तोही कवडीमोल भावाने विकला जात असल्याने बळीराजा आर्थिक विंवचनेत सापडला आहे. आर्थिक विंवचनेत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने दिंनाक १ नोव्हेबर ते १५ डिसेंबर दरम्यान विक्र ी झालेल्या कांदयाला २०० रूपये प्रति क्विंटल व २०० क्विंटल कांदयाला अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
पण सटाणा बाजार समिती या दरम्यान १५ दिवस बंद असल्याने बरेच शेतकरी हया अनुदान पासून वंचित राहणार आहेत तसेच बळीराजांना हया मिळणाºया अनुदानाची पुर्वकल्पना नसल्याने बºयाच शेतकºयांची कांदा विक्र ी ही मुलाच्या, पत्नीच्या नावाने झाली आहे. मात्र सातबारा वडीलांच्या नावाने आह.े तर काहींनी आपल्या टोपन नावाने कांदा विक्र ी केली आहे तरी शासनाने सर्व बाजार समित्यांना मध्ये विक्र ी केलेल्या कांदा विक्र ेत्यांना सरसकट अनुदान दयावे अशी मागणी बळीराजाकडून तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी बाजार समिती संचालक संजय बिरारी, सुभाष सावकार, प्रमोद बिरारी, विनायक देवरे, केदा सावकार, पंढरीनाथ भामरे उपस्थित होते.
प्रतिक्रि या ---------
बागलाण तालूक्यातील बहुतांशी शेतकरी मुंबई बाजार समतिीत कांदा विक्र ी करत असतात पण शासनाने अनूदानासाठी मुंबई बाजार समितीत विक्र ी झालेल्या कांदयास वगळले असल्याने बरेच शेतकरी अनूदानापासुन वंचित राहणार आहे. विक्र ेत्या बळीजाला जाहिर झालेल्या अनुदानाची पुर्वकल्पना नसल्याने बºयाच शेतकरी वर्गाचा कांदा मुलाच्या, पत्नीच्या, टोपणनावाने, विक्र ी झाला आहे. त्यामुळे अनुदानासाठी सातबारा उताºयाची अट न टाकता सरसकट कांदा विक्र ेत्यांना अनुदान दयावे.
संजय बिरारी
विद्यमान संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती.
कांदा उत्पादक शेतकरी.