आठवडाभरानंतर शहरात पावासाचा शिडकावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:49 PM2018-08-04T19:49:53+5:302018-08-04T19:56:07+5:30

कमी दाबाचा पट्टा निर्माण न होणे आणि मान्सून कमकुवत असल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. जुलै माहिन्यातदेखील फारसा समाधानकारक पाऊस झाला नाही.

Spread the pavana in the city after a week | आठवडाभरानंतर शहरात पावासाचा शिडकावा

आठवडाभरानंतर शहरात पावासाचा शिडकावा

Next
ठळक मुद्देकमी दाबाचा पट्टा निर्माण न होणे आणि मान्सून कमकुवत असल्यामुळे पावसाचे प्रमाण घटलेसंध्याकाळपर्यंत तीन मि.मी. तर पंचवटी-पेठरोड परिसरात एक मि.मी. पाऊस

नाशिक : आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली होती. शनिवारी (दि.४) दुपारनंतर शहरात ढगाळ हवामान दाटून आल्याने पावसाचा शिडकावा झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात संध्याकाळपर्यंत तीन मि.मी. तर पंचवटी-पेठरोड परिसरात एक मि.मी. पाऊस पडल्याची नोंद संबंधित यंत्रणेकडून करण्यात आली.
कमी दाबाचा पट्टा निर्माण न होणे आणि मान्सून कमकुवत असल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. जुलै माहिन्यातदेखील फारसा समाधानकारक पाऊस झाला नाही. मागील आठ ते दहा दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप दिली होती. कमाल तपमानही २८ अंशांपर्यंत सरकले होते. शनिवारी पावसाचा शिडकावा झाल्यामुळे तपमान २६ अंशांवर आले तर किमान तपमान २२.१ अंश इतके नोंदविले गेले. वातावरणात आर्द्रता सकाळी साडेआठ वाजता ९७ टक्के तर संध्याकाळी ८२ टक्के इतकी होती.


सकाळी पावसाच्या सरींचा हलका वर्षाव शहरातील काही भागांसह उपनगरांमध्ये झाला. त्यानंतर पुन्हा आकाश स्वच्छ झाले. दुपारी ढग दाटून आल्याने काही प्रमाणात सरी कोसळल्या. जिल्हाधिकारी कार्यालय, सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, शरणपूररोड, कॉलेजरोड या भागात पावसाच्या सरींचा वर्षाव झाला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पर्जन्यमापकानुसार तीन मि.मी. तर पेठरोडच्या हवामान केंद्राप्रमाणे एक मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली.

Web Title: Spread the pavana in the city after a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.