मालेगावातील ग्रामीण भागातही फैलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 08:35 PM2020-05-22T20:35:07+5:302020-05-22T23:44:12+5:30
मालेगाव : मालेगाव शहरात कोरोनाचे थैमान सुरूच असताना आता तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होऊ लागल्याने चिंता वाढत चालली आहे. तालुक्यातील रावळगाव, लोणवाडे, चंदनपुरी या गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
मालेगाव : मालेगाव शहरात कोरोनाचे थैमान सुरूच असताना आता तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होऊ लागल्याने चिंता वाढत चालली आहे. तालुक्यातील रावळगाव, लोणवाडे, चंदनपुरी या गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
मालेगाव शहरातील द्याने भागात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी (दि. २१) सकाळी मिळालेल्या आठ बाधित रुग्णानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आतापर्यंत मालेगावात ६८४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान, कोरोनाने ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला असून, तालुक्यातील रावळगाव, लोणवाडे, चंदनपुरी गावामध्येही कोरोनाचा फैलाव होऊ लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ९४ जणांचे अहवाल आले. त्यात ८३ जण निगेटिव्ह तर ११ जण पॉझिटिव्ह आढळले.
पश्चिम भागातही पसरले हातपाय
शहरातील पश्चिम भागातही आता कोरोनाने हातपाय पसरल्याने चिंता वाढल्या आहेत. सुरूवातीला पूर्व भागात रूग्ण आढळून आले होते. महिनाभरात येथील रुग्णसंख्या चारशेच्या पुढे गेली तोपर्यंत पश्चिम भागात कोरोनाचा प्रवेश झाला नव्हता. मात्र आजमितीला पश्चिम भागातील विविध परिसरात शंभरहून अधिक रूग्ण कोरोनाबाधित आहेत. पूर्व व पश्चिम भागात कोरोनाचा फैलाव होत गेला.
---------
उच्च पदस्थ अधिकारी कोरोनामुक्त
मालेगाव महानगरपालिकेतील उच्च पदस्थ अधिकाºयानेही कोरोनावर मात केली असून, सदर अधिकाºयाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, मालेगावात स्वतंत्र प्रयोगशाळा होत असून, त्यामुळे लोकांना अवघ्या चार तासात अहवाल मिळणार आहे. भारतीय जैन संघटनेने दिलेल्या आठही रुग्ण वाहिका गावागावात रुग्ण शोधमोहिमेत असून, आता सदर वाहनात एक्सरेची सोय असल्याने त्यातून ज्या रुग्णाच्या घशातील स्त्रावाचा नमुना घ्यायची आवश्यकता असेल त्याच इसमाचा नमुने तपासण्याची सोय होणार आहे. त्यामुळे सर्वच रुग्णाचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात वाया जाणारा वेळ वाचणार असल्याचे महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी सांगितले.