काळाराम मंदिरातील वासंतिक नवरात्र उत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:28+5:302021-04-10T04:14:28+5:30

दि. १३ ते २३ एप्रिल या कालावधीत रामजन्मोत्सव निमित्ताने वासंतिक नवरात्र उत्सव आयोजन केले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू ...

Spring Navratra celebrations at Kalaram temple canceled | काळाराम मंदिरातील वासंतिक नवरात्र उत्सव रद्द

काळाराम मंदिरातील वासंतिक नवरात्र उत्सव रद्द

Next

दि. १३ ते २३ एप्रिल या कालावधीत रामजन्मोत्सव निमित्ताने वासंतिक नवरात्र उत्सव आयोजन केले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासन स्तरावर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांना व मंदिरांना आवाहन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्थानने निर्णय घेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ३० एप्रिलपर्यंत मंदिर बंद केले आहे. गेल्यावर्षी देखिल कोरोना सावट असल्याने उत्सव रद्द केला होता तर गेल्या मार्च महिन्यापासून राज्यात पुन्हा कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढल्याने काळाराम मंदिराच्या इतिहासात दुसऱ्यांदा वासंतिक नवरात्र उत्सव स्थगित करण्यात आला आहे. उत्सव कालावधीत मंदिराची नियमित साफसफाई केली जाईल तसेच उत्सवा निमित्ताने मंदिर सजावट पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार होणार मात्र भाविकांसाठी होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत. काळाराम संस्थान सामाजिक जाणीव व भक्तांचे हित जपणारी संस्था आहे म्हणून संस्थांच्या विश्वस्तांशी चर्चा करून सदर निर्णय घेतला आहे.

इन्फो====

मंदिरात नियमित स्वच्छता

श्री काळाराम जन्मोत्सवनिमित्त उत्सव काळात मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चा कार्यक्रम पूर्वापार होतील. उत्सव काळात मंदिराची नियमित सफाई करून पुजारी वर्गाला हात धुवून मंदिरात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून उत्सव मानकरी आणि मोजक्या पुजारी वर्गाच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने साजरा केला जाणार आहे.

Web Title: Spring Navratra celebrations at Kalaram temple canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.