श्री काळाराम मंदिरात चैत्र पाडव्याला वासंतिक नवरात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:28 IST2021-04-13T23:05:04+5:302021-04-14T01:28:13+5:30
यंदा पाडव्याला गुढी उभारण्यात आली तसेच महिलांनी रांगोळ्या काढून परिसर सुशोभित केला.

श्री काळाराम मंदिरात चैत्र पाडव्याला वासंतिक नवरात्रोत्सवास प्रारंभ
ठळक मुद्देपाडवा सण मोठा...
नाशिक : कोरोनाचे संकट आणि कडक निर्बंधानंतरही नाशिकमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. जुन्या नाशिकमध्ये गावठाणमध्ये पारंपरिक उत्साहात गुढी उभारण्यात आली.
नाशिकमधील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात चैत्र पाडव्याला वासंतिक नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असतो. यंदा पाडव्याला गुढी उभारण्यात आली तसेच महिलांनी रांगोळ्या काढून परिसर सुशोभित केला. मात्र, वासंतिक नवरात्रातील सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.