पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा : ६० जनावरांना रॅबिजची लागण नऊ जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:39 PM2017-10-01T23:39:11+5:302017-10-02T00:08:35+5:30
अंगुलगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने ९ जनावरांचा मृत्यू व ६० जनावरांना रॅबिजची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंगुलगाव येथील ८ गायी व एक बैल रॅबिजच्या आजाराने मरण पावला आहे. साधारण ५० हजार रुपये किमतीची जनावरे दगावली आहे. शेतकरी बांधवाचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे.
येवला : अंगुलगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने ९ जनावरांचा मृत्यू व ६० जनावरांना रॅबिजची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंगुलगाव येथील ८ गायी व एक बैल रॅबिजच्या आजाराने मरण पावला आहे. साधारण ५० हजार रुपये किमतीची जनावरे दगावली आहे. शेतकरी बांधवाचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे.
अंगुलगाव परिसरात पिसाळलेल्या कृत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या वेळी जनावरे वस्त्यांवर बाहेर बांधलेली असतात. त्यामुळे जनावरांना चावा घेऊन कुत्री पळून जातात. त्यामुळे जनावरे विचित्र वर्तन करू लागल्याने हा प्रकार लक्षात आला. जनावरे माणसांनादेखील जवळ येऊ देईना. आणि सारखी धाऊ लागल्याने जनावरे रॅबिजची लागण झाल्याचे लक्षात आले. गावातील वस्तीवरील ६० जनावरांना रॅबिज झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०१० मध्ये झोपेतच ७ शेतकºयांना कुत्र्याने चावा घेतला होता. तसेच सध्या जनावरांना मोठ्या प्रमाणात पिसाळलेल्या कुत्र्यांकडून त्रास होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी बांधवांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड यांनी पशुवैद्य डॉ. आर. एस. गोसावी, डॉ. पी. ई. अनर्थे, डॉ. बी. पी. पवार, डॉ. एच. डी. रोकडे, डॉ. आर. सी. पगारे व डॉ.राजेंद्र झाल्टे यांना अंगुलगाव येथील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन तत्काळ ए. आर. व्ही. लसीकरण करण्यास सांगितले. पाचही पशुवैद्यकीय अधिकाºयांना सर्व जनावारांची पाहणी करून जनावरांना रॅबिजची लागण झाली असल्याचे स्पष्ट केले. नाना तुकाराम झाल्टे , बाळु खंडू देवरे, जालिंदर मिच्छंद्र देवरे, नामदेव पुंजा हाळगे, कचरू दुबे, दिगंबर आसाराम देवरे, साहेबराव गंगाधर देवरे, भाऊसाहेब गायकवाड यांच्या गायी, तर गोरख तुळशीराम झाल्टे यांच्या मालकीचा बैल दगावला आहे.